विद्यार्थी परीक्षेत तर शिक्षक प्रचारात दंग
By admin | Published: April 13, 2015 02:23 AM2015-04-13T02:23:51+5:302015-04-13T02:23:51+5:30
जिल्ह्यात सर्वच शाळांमधून वार्षिक परीक्षेचा कालावधी सुरू असताना शिक्षक मात्र पतपेढी निवडणुकीत गुंग असल्याचे दिसून येत आहे.
वाडा : जिल्ह्यात सर्वच शाळांमधून वार्षिक परीक्षेचा कालावधी सुरू असताना शिक्षक मात्र पतपेढी निवडणुकीत गुंग असल्याचे दिसून येत आहे. परीक्षेची काळजीवजा शांतता अपेक्षीत असताना शाळांमधून निवडणुकीच्याच गप्पा सुरू असून या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तर होणार नाही ना अशी चिंता पालकांकडून व्यक्त होत आहे.
१९ एप्रिल रोजी शिक्षक पतपेढीची निवडणुक होणार असून वाडा तालुका पतपेढीवर संचालक म्हणून जाण्यासाठी तालुक्यातील चार शिक्षक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. १ एप्रिल पासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळ सत्रात भरत असल्याने निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना चांगलाच वेळ मिळत असला तरी परीक्षा घेणे, पेपर तपासणी, नोंदवली भरणे, अंतीम निकालपत्रक तयार करणे, वर्षभराची इतर कामेही आहेत. तालुका पतपेढीसाठी मधुकर थाळेर, उमेश खिराडे, संजय पाटील व निलीमा पाटील हे शिक्षक उमेदवार निवडणुक लढवत आहेत.