बाराव्या मजल्यावरून विद्यार्थिनीची उडी

By admin | Published: November 23, 2014 02:43 AM2014-11-23T02:43:23+5:302014-11-23T02:43:23+5:30

‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रय} करणा:या सिमरन केणी या दहावीतील 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

Student jump from 12th floor | बाराव्या मजल्यावरून विद्यार्थिनीची उडी

बाराव्या मजल्यावरून विद्यार्थिनीची उडी

Next
मुंबई : डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रय} करणा:या सिमरन केणी या दहावीतील 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. आज संध्याकाळी 6च्या सुमारास येथील महावीर टॉवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आले असून एका तरूणीचाही शोध पोलीस घेत आहेत.
सिमरन हिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज मुलुंड पोलीस वर्तवित आहेत. मात्र हत्येच्या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करीत असल्याचे समजते. मुलुंड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी व तपास सुरू केला आहे. तपासाची सुरुवात इमारतीच्या सुरक्षारक्षकांपासून झाल्याचे समजते. ही विद्यार्थिनी  या इमारतीत राहणारी नव्हती. मग ती 
आत गेलीच कशी, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यासाठी सुरक्षारक्षकांचे जबाब नोंदविले जात आहेत.
पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल रंगाचे टी-शर्ट आणि काळी जीन्स परिधान केली होती. ती या इमारतीत राहत नव्हती, त्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना बरीच धावपळ करावी लागली. या घटनेच्या तपासासाठी सर्व पोलीस ठाण्यांना माहिती पुरविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
 
च्सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या डाव्या हाताच्या पंजावर आय हेट यू या वाक्यापुढे एका तरुणाचे नाव लिहिलेले होते. त्यावर पुसटसा मोबाइल नंबरही दिसत होता. मात्र या नंबरमध्ये फक्त आठच आकडे होते. 
च्तरुणाच्या नावाची सुरुवात एमवरून होते. मात्र पुढील अक्षरे मिटल्याने पोलिसांना फक्त एम अक्षर आढळले. या अर्धवट माहितीच्या आधारावर शोध घेण्यासाठी पोलिसांना खूप प्रय} करावे लागले. अखेर रात्री उशिरा  तिची ओळख पटली. 

 

Web Title: Student jump from 12th floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.