रेल्वे अपघातात विद्यार्थ्याने गमावला पाय

By Admin | Published: February 9, 2016 01:05 AM2016-02-09T01:05:02+5:302016-02-09T01:05:02+5:30

दरवाजात उभा राहून प्रवास करणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघात होऊन त्याला आपला उजवा पाय गमवावा लागला आहे आणि डाव्या पायाची चार बोटे तुटली आहेत. त्याच्यावर

The student lost his legs in a railway accident | रेल्वे अपघातात विद्यार्थ्याने गमावला पाय

रेल्वे अपघातात विद्यार्थ्याने गमावला पाय

googlenewsNext

मुंबई : दरवाजात उभा राहून प्रवास करणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघात होऊन त्याला आपला उजवा पाय गमवावा लागला आहे आणि डाव्या पायाची चार बोटे तुटली आहेत. त्याच्यावर जे.जे रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
वांद्रे (पूर्व) येथील भारतनगरमध्ये राहणारा कासिम कादली (१४) हा मशीद बंदर येथील हासमिया हायस्कूलमध्ये नववीत शिकतो. सोमवारी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी कासिमने दुपारी अडीचच्या सुमारास लोकल पकडली.
दरवाजात उभे राहून प्रवास करताना सॅन्डहर्स्ट रोड ते डॉकयार्ड रोड दरम्यान कासिमचा तोल गेला आणि तो खाली पडला. लोकलमधून पडल्यावर त्याच्या उजव्या पायावरून आणि डाव्या पायाच्या बोटांवरुनही लोकल गेली.
या अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) नियंत्रण कक्षाला दिली व तत्काळ घटनास्थळी पोलीस पाठविण्यात आले. त्यानंतर कासिमला जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The student lost his legs in a railway accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.