Join us

मतदानाचा हक्क बजावा; पथनाट्यातून जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 10:54 AM

एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ परिसरात ‘मतदान अमूल्य दान’ या पथनाट्यातून जनजागृती केली.

मुंबई : २० मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीचा एक भाग म्हणून ‘मतदान करा हो...मतदान करा...नागरिकहो,मतदान करा...’ अशी साद घालत एसएनडीटी विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थिनींनी पथनाट्यातून मुंबईकरांमध्ये मतदानाची जनजागृती केली.

एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ परिसरात ‘मतदान अमूल्य दान’ या पथनाट्यातून जनजागृती केली. उपनगर ‘स्वीप’च्या शिक्षण विस्तार विभाग आणि एसएनडीटी विद्यापीठाच्या सामाजिक कार्य विभागातर्फे या पथनाट्याचे आयोजन करण्यात होते.  यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी मतदारांनी नोंदणी कशी करावी, डिजिटल पद्धतीचा वापर करून आपले नाव नोंदविल्याची खात्री कशी करावी, मतदार नोंदणी विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी १९५० या मतदार मदत क्रमांकाचा वापर करावा. याबाबत मतदानाचा आपला हक्क बजावण्याचा संदेश या पथनाट्याद्वारे देण्यात आला.

यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव, प्र. कुलगुरू प्रा. रबी ओझा, सामाजिक कार्य विभागाचे संचालक प्रा. प्रभाकर चव्हाण, अधिष्ठाता प्रा. मेधा तापियावाला, विद्यापीठाच्या स्वीपच्या मुख्य नोडल अधिकारी प्रा. मनीषा माधवा, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईविद्यार्थीलोकसभा निवडणूक २०२४