सीईटी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाबाबत विद्यार्थी संघटना आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 02:54 PM2019-06-22T14:54:28+5:302019-06-22T14:54:43+5:30

एमएच सीईटी च्या पर्सेटाईलच्या नवीन सूत्रांमुळे पीसीएमच्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे असा आरोप करत विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

Student organization aggressive about the CET admissions process | सीईटी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाबाबत विद्यार्थी संघटना आक्रमक 

सीईटी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाबाबत विद्यार्थी संघटना आक्रमक 

Next

मुंबई -  सीईटी सेलच्या पदाधिकऱयांच्या हलगर्जीपणामुळे 3 लाख  विद्यार्थ्याची व्यावसायिक अभ्यासक्रमाची नोंदणी रद्द झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक  त्रास सहन करावा लागला असून त्यांचा वेळही वाया गेला आहे. त्यामुळे  व्यावसायिक अभ्यासक्रम  प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गोंधळात गेली आहे असा आरोप प्रहार विद्यार्थी संघटनेकडून राज्य सरकारवर करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राज्य सामायिक परीक्षा संचालकांची भेट घेतली आहे. एमएच सीईटी च्या पर्सेटाईलच्या नवीन सूत्रांमुळे पीसीएमच्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे असा आरोप करत विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ असा इशारा युवासेनेने दिला आहे. 

प्रहारच्या मागण्या -
1) सुविधा केंद्राच्या संख्येत वाढ करावी.
2) ठाणे,कल्याणला सुद्धा सुविधा केंद्र वाढविण्यात यावीत.
3) झेरॉक्स, स्कॅनिंग आणि अपलोडिंग मोफत स्वरूपात सुविधा केंद्रावरच करण्यात यावीत..
4) CET सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या खिशातून विद्यार्थ्यांना झेरॉक्स, स्कॅनिंग,अपलोडिंग आणि प्रवास खर्च देण्यात यावा .
5) झालेल्या गोंधळाबद्दल CET सेलच्या पदाधिकाऱ्यांवर चौकशी समिती बसवावी
 

Web Title: Student organization aggressive about the CET admissions process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.