आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचे रॅगिंग
By admin | Published: December 31, 2016 03:41 AM2016-12-31T03:41:38+5:302016-12-31T03:41:38+5:30
पवई येथील आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या मूड इंडिगो फेस्टिव्हलसाठी राजस्थानहून आलेल्या एका विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याची घटना उघडकीस आली.
मुंबई : पवई येथील आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या मूड इंडिगो फेस्टिव्हलसाठी राजस्थानहून आलेल्या एका विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याची घटना उघडकीस आली.
या प्रकरणी चार विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. दिव्यांश चौधरी (२॰),
उत्कर्ष शर्मा (२॰), सोबीत कनकारिया यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये नुकताच मूड इंडिगो हा फेस्टिव्हल झाला. या फेस्टिव्हलसाठी राजस्थान येथील कोटा येथून आशुतोष बगोरा (२॰) हा महाविद्यालयीन ग्रुपसह या ठिकाणी आला होता. बाहेर
राहण्याची व्यवस्था न झाल्याने तो आयआयटी कॅम्पसमधील मित्राकडे थांबला होता.
एका कार्यक्रमाहून रात्री उशिरा आल्यानंतर हॉस्टेलमधील तरुणांनी त्याला बोलावून, रँगिंग करण्यास सुरुवात केली.
बगोरा याने पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. या तरुणांनी मारहाण केल्याचा आरोपही बगोरा याने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.