दुसरी इयत्तेतून विद्यार्थिनीला चौथीत प्रवेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 02:24 AM2020-06-12T02:24:30+5:302020-06-12T02:24:36+5:30
पालकांना नाहक त्रास : इंग्रजी शाळेच्या दहिसर शाखेतील प्रकार
मुंबई : दहिसरच्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीच्या विद्यार्थिनीला थेट चौथीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. तिच्या पालकांनी याबाबत शाळा प्रशासनाला तक्रार केली असून अव्वाच्या सव्वा फी आकारणाऱ्या शाळांकडून असा निष्कळजीपणा होत असल्याचे या प्रकारातून उघड झाले आहे.
दहिसर परिसरात इंग्रजी माध्यमाची ही शाळा आहे़ त्या ठिकाणी इयत्ता दुसरीच्या वर्गात ही विद्यार्थिनी शिकत होती. तिला २०२०-२१मध्ये इयत्ता तिसरीमध्ये प्रवेश मिळणार होता. त्या मुलीला शाळेने थेट चौथीच्या वर्गात प्रवेश दिला. ही बाब तिच्या पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आॅनलाइन क्लास दरम्यान याचा मेसेज कमेंटमध्ये केला.
कोरोनाच्या संकटात आर्थिक स्थिती ढासळलेल्या पालकांना शाळेची फी भरण्यापासून काहीच दिलासा व्यवस्थापन तसेच सरकारकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे मुलाच्या भविष्याचा विचार करत पालक काढओढ करत ही रक्कम उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शाळा कर्मचाºयाच्या वेतनाचे कारण पुढे करत पालकांकडून फी आकारण्यात येत आहे. त्यामुळे अशा चुकांबाबतही शाळेने सतर्क राहावे, असे पालकांचे म्हणणे आहे.
शाळेचा निष्काळजीपणा
च्पालकांनी ही बाब शाळेच्याही लक्षात आणून देत आयटी विभागाला हे कळविण्याची विनंती केली. तंत्रज्ञान विभागाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे़ यावरून एकंदर प्रशासनाचा निष्कळजीपणा उघड झाला आहे.