दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी १० डिसेंबरपर्यंत रेल्वे प्रवासाची मुभा
By कुणाल गवाणकर | Published: November 20, 2020 11:29 PM2020-11-20T23:29:14+5:302020-11-20T23:30:34+5:30
वैध ओळखपत्रांसह लोकलनं प्रवास करता येणार; मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती
मुंबई: राज्य सरकारच्या विनंतीवरून रेल्वे मंत्रालयानं दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी रेल्वे प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. वैध ओळखपत्र असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाचं वैध हॉल तिकिटे घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत उपनगरीय रेल्वेने प्रवास करता येईल. रेल्वे स्टेशनवर प्रवेशासाठी वैध ओळखपत्र/परीक्षेचं हॉल तिकिटं आवश्यक असेल.
राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेले घटक वगळता इतरांनी स्थानकावर गर्दी करू नये. तसेच प्रवाशांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन रेल्वेनं केलं आहे. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयानं प्रवासाची परवानगी दिलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणीही रेल्वे स्थानकांवर जाऊ नये, अशा सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रेल्वेतून प्रवास करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
Ministry of Railways grants permission to teaching & non-teaching staff carrying valid id cards, students carrying valid hall tickets for Maharashtra State Board of Secondary&Higher Education Examinations, to travel by suburban services over Mumbai Suburban network up to 10 Dec.
— ANI (@ANI) November 20, 2020
मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच, ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही घेतला महत्त्वाचा निर्णय
आज सकाळी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मुंबईतल्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्यात येणार असल्याचं मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षा देण्यासाठी जाणारे विद्यार्थी रेल्वेनं प्रवास करू शकतात.
मुंबईतील शाळा ३१ डिसेबरपर्यंत बंद
गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली. मात्र दिवाळी आणि सणावारांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीची बाब म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ३१ दिवसांपर्यंत बंद ठेवण्याची घषोणा केली आहे. तसेच २३ नोव्हेंबरपासून सुरू होणारे ९ ते १२वीचे वर्गही सुरू न करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.