विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला

By admin | Published: July 5, 2014 12:02 AM2014-07-05T00:02:54+5:302014-07-05T00:02:54+5:30

खेड्यापाड्यांत सुरू केलेल्या अनधिकृत शाळांमधून पालकांची होणारी लूट, याविरोधात वाढणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अशा शाळांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.

Students' academic fortune hangs | विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला

Next

संजय कांबळे, वरपगाव
खेड्यापाड्यांत सुरू केलेल्या अनधिकृत शाळांमधून पालकांची होणारी लूट, याविरोधात वाढणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अशा शाळांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून संस्था व्यवस्थापनाला एक लाखाचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या शाळांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२५ शाळा आहेत. या ठिकाणी १२ ते १३ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. असे असताना, म्हारळ, वरप, धोबीघाट, शहाड, रायता, कांबा, गोवेली, मामनोली, मांडा, टिटवाळा, दावडी, भोरप, आजदे, नांदिवली, कोळे, गोतवली, निळजे, दहिसर, सोनारपाडा, मानपाडा आदी गावांत मोठ्या प्रमाणात मराठी, हिंदी, इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विविध प्रलोभनांमुळे पालक अशा शाळेत मुलांचा प्रवेश घेतात आणि त्यानंतर त्यांची फसवणूक होते.
शिक्षणाचा बाजार थांबवण्यासाठी कल्याण पंचायत समितीमधील सदस्यांच्या बैठकीत अशा अनधिकृत शाळांवर कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार, गटशिक्षणाधिकारी संजय थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले. त्यामध्ये दोन विस्तार अधिकारी, दोन केंद्रप्रमुख, एक कार्यालयीन विषयतज्ज्ञ यांचा समावेश करण्यात आला. या पथकाने टाकलेल्या धाडीत कै. प्रज्ञा भावे विद्यालय नांदिवली कोले, बीटी. गायकवाड इंग्रजी विद्यालय, गायत्री विद्यालय, जिजामाता विद्यालय, होली मारिया कॉन्व्हेंट स्कूल, निळजे, आदर्श हिंदी-मराठी-इंग्रजी माध्यमिक शाळा, वैभव हिंदी प्राथमिक विद्यालय दावडी शाळा अनधिकृतपणे सुरू आढळले. तर या शाळा बंद करण्याच्या नोटिसा जागीच बजावण्यात आल्या आहेत.

Web Title: Students' academic fortune hangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.