Join us

संशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:49 AM

विद्यापीठाला पुन्हा लौकिक प्राप्त करून द्यावा, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले.

मुंबई : शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळून राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण पद्धतीमध्ये आज अमूलाग्र बदल होत आहेत; त्यात राष्ट्र सेवा म्हणून युवकांनी पुढाकार घ्यावा. संशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा. विद्यापीठाला पुन्हा लौकिक प्राप्त करून द्यावा, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले.कलिना येथील फिरोजशहा मेहता भवनात बुधवारी ‘राष्ट्रीय सेवा योजना २०१७-१८ पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. या वेळी सुहास पेडणेकर बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयास पुरस्कार प्रदान करण्यात आले.कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयात टी.वाय.बीएमएसला शिकणाºया सुरज चौहानला उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध प्रकारच्या उपक्रमात सुरजचा सहभाग असतो. राज्यस्तरीय आव्हान शिबिर तसेच महाविद्यालयातील मलेरिया जनजागृती, वृक्षारोपण मोहीम, एड्स जनजागृती, रस्ते सुरक्षा मोहीम, योग शिबिर, रक्तदान शिबिर, कर्करोग संदर्भात जनजागृती, बालविकास व शैक्षणिक उपक्रम, आदिवासी भागात वैद्यकीय शिबिर, स्वच्छता अभियान, पॉलिथीन बॅगविरोधी मोहीम, आश्रमशाळेतील मुलांना शिकवणे आणि नशामुक्तीबाबत पथनाट्य अशा अनेक कार्यक्रमांत हिरिरीने भाग घेतला होता.ग्रामीण व शहरी अशा दोन भागांमधून पुरस्कार दिला जातो. यात ग्रामीण आणि शहरी विभागातून दोन मुले व मुलींची निवड केली जाते. या चार मुलांमध्ये सुरज चौहान याची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पहिल्या क्रमांकावर निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकूर महाविद्यालयाचे प्राध्यापक सुशील शिंदे यांनी दिली. दरम्यान, केसी महाविद्यालयाचे डॉ. सतीश कोलते यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या महाविद्यालयाला उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना एककचा पुरस्कार देण्यात आला.पुरस्काराचे मानकरीशहरी भागातील चर्चगेट येथील के.सी. महाविद्यालयातील विद्यार्थिनी आत्मया वर्तक, ग्रामीण भागातील कल्याण येथील मॉडेल कॉलेजमधील अनिकेत गुप्ता आणि खेडमधील आय.सी.एस. कॉलेजची विद्यार्थिनी अक्षता चाळके यांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षण