अतिरिक्त शुल्क घेऊनही विद्यार्थी सोयी-सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 02:37 AM2018-09-22T02:37:58+5:302018-09-22T02:38:00+5:30
कॉलेजेसकडून आकारली जाणारी अतिरिक्त फी हा विद्यार्थ्यांसाठी मनस्ताप ठरत आहे.
मुंबई : कॉलेजेसकडून आकारली जाणारी अतिरिक्त फी हा विद्यार्थ्यांसाठी मनस्ताप ठरत आहे. बोरीवलीच्या आदित्य आर्किटेक्चर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी आकारली जातच आहे, सोबतच विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत, युवासेनेने थेट कॉलेजवर मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले. इतकेच नाही, तर प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे लिखित आश्वासनही लिहून घेतले आहे. बोरीवली येथील आदित्य आर्किटेक्चर कॉलेजमध्ये कॅन्टीनसाठी ५ हजार रुपये, तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तब्बल ११ हजार रुपये फी आकारल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आले आहे. शिवाय सोयी-सुविधांसाठी अतिरिक्त शुल्क आकारूनही एसी, लिफ्ट यांसारख्या सोयींपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे, पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून युवासेनेकडे करण्यात आली होती. युवासेनेने शुक्रवारी या ठिकाणी आंदोलन केले़
>विद्यार्थ्यांच्या पुढील समस्या सोडविणार
शुल्क नियंत्रण समितीने निर्धारित केलेली अधिकृत शुल्क रुपये १,३१,०००/- विद्यार्थ्यांकडून घेण्यात येईल.
अतिरिक्त ५०,०००/- भरले नाही, म्हणून लिफ्ट व एसीसुद्धा बंद करण्यात आले होते, ते पुढे सुरू करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.
विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य फी आकारणे.