Join us

गाडी वेळेवर नसल्याने विद्यार्थी त्रस्त

By admin | Published: November 23, 2014 10:55 PM

मुरुड एसटी आगारातील गाड्या वेळेवर सुटत नसल्याने असंख्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यापैकीच मुरुड - केळघर ही गाडी कधीही वेळेवर सुटत नाही

आगरदांडा : मुरुड एसटी आगारातील गाड्या वेळेवर सुटत नसल्याने असंख्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यापैकीच मुरुड - केळघर ही गाडी कधीही वेळेवर सुटत नाही. सायं. ५.०० वाजताच्या गाडीसाठी प्रवाशांना तीन तास तिष्ठत रहावे लागत आहे. याबाबत धनगर समाजाचे अध्यक्ष धर्माजी हिरवे व इतर अनेक प्रवाशांनी या गाडीबाबत मुरुड आगार व्यवस्थापकांशी तक्रारी करून गाडी कधीच वेळेवर सुटत नसल्याचे सांगितले. केळघर या गाडीत रोज ४० ते ४५ विद्यार्थी प्रवास करतात. परंतु गाडी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात. गाडीतून उतरल्यापासून गारंबी फाट्यापासून पारगाण, धनगरवाडी गाव ३ किमी अंतरावर, वाघपट्टी गाव २ किमी अंतरावर, साठलेची वाडी हा गाव ६ किमी अंतर, केळघरपासून वादखोडा ते खडकी गाव हे ८ किमी अंतरावर प्रत्येक अशाप्रकारे हे गाव आहेत. विद्यार्थी व प्रवाशांना पायी जावे लागते. हे गाव जंगलात असल्यामुळे जर गाडी उशिरा आल्याने पालकांमध्ये भीती निर्माण होते. आगार व्यवस्थापकांनी वेळ सुधारून गाड्या सोडण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)