Join us

गृहपाठासाठी ऑनलाइन लर्निंगकडे विद्यार्थ्यांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 12:47 AM

ऑनलाइन लर्निंगला जगभरात अभ्यास करण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत म्हणून मान्यता मिळाली आहे.

मुंबई : ऑनलाइन लर्निंगला जगभरात अभ्यास करण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतातही याचा प्रभाव असून भारतातील तब्बल ४६.४ टक्के विद्यार्थी याचा खूप फायदा होत असल्याचे मान्य करतात. गृहपाठ करतेवेळी ३२.८ टक्के विद्यार्थी आॅनलाइन लर्निंगचा वापर करतात. ३४.७ टक्के विद्यार्थ्यांना आॅनलाइन लर्निंगचा वापर कठीण प्रश्न आणि गृहीतके सोडविण्यासाठी, समजावून घेण्यासाठी करतात. ब्रेनली या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठीच्या जगातील सर्वात मोठ्या आॅनलाइन शिक्षण समुदायाने आपल्या भारतीय यूझरबेसवर सर्वेक्षण केले.याच पार्श्वभूमीवर भारतातील विद्यार्थ्यांवर आॅनलाइन लर्निंगचा झालेला परिणाम, त्याचा वाढलेला वापर आणि त्याचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे जाणून घेण्याच्या उद्देशाने ब्रेनली या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठीच्या जगातील सर्वात मोठ्या आॅनलाइन शिक्षण समुदायाने आपल्या भारतीय यूझरबेसवर सर्वेक्षण केले.द पॉवर आॅफ पीअर्स म्हणजे सहअध्ययनाची ताकद शीर्षकांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात निदर्शनास आले की, सुमारे २५.७% सहभागी हे प्रोजेक्ट आणि असाइनमेंट्सवर समूहात अभ्यास करणे पसंत करतात, तर २२.६% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वाटते की परीक्षेदरम्यान समूहात अभ्यास करणे गरजेचे आहे. यापैकी १३.२% विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभर समूहात अभ्यास करणे पसंत केले आहे, जे त्यांच्यासाठी एकत्र होऊन अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.सुमारे १७०० विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या सर्वेक्षणात आॅनलाइन अभ्यास यंत्रणेचा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात फायदा होतो का, असे विचारले असता ३४.७% पेक्षा सहभागींनी त्यांना इतर सहाध्यायींच्या साहाय्याने कठीण प्रश्न सोडविण्यास मदत झाल्याचे नमूद केले.२५.७% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा झाल्याचे सांगितले तर १५.९% विद्यार्थ्यांनी या ई-लर्निंग साधनांच्या मदतीने त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे कबूल केले. शिवाय १५.६% विद्यार्थ्यांनी सांगितले की, या आॅनलाइन लर्निंग पद्धतीमुळे त्यांना समविचारी साथीदारांशी संलग्न होण्यास व त्यांच्याकडून शिकण्यास मदत झाली आणि सर्वांगीण शिक्षणाचा तो एक अविभाज्य भाग आहे.>ज्ञानाची देवाण-घेवाण ज्ञानवृद्धी करते, असे म्हणतात ते खरेच आहे आणि आॅनलाइन लर्निंग मंचाच्या उदयातून हे अगदी योग्यप्रकारे आपल्यासमोर आले आहे. विशेषत: भारतासारख्या देशात जेथे विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी गृहपाठ आणि असाइनमेंट्स यावर शिक्षण प्रणालीची मोठी भिस्त असते, तेथे ही संकल्पना वेगाने पसरत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी, पालक, तज्ज्ञ आणि शिक्षक या सर्वांचीच मान्यता त्यास मिळत आहे.- मिचल बोर्कोवस्की, सहसंस्थापक आणि सीईओ, ब्रेनली