मुंबई : विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. फक्त ५ दिवसांनी परीक्षा पुढे ढकलल्याने, आता स्टुडंट लॉ कौन्सिलसह विद्यार्थ्यांनी एलएलएम परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. परीक्षा विभाग गोंधळात गोंधळ घालत असल्याने, विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतला आहे.मुंबई विद्यापीठाचे यंदाचे १६०वे वर्ष आहे. यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी सुरू करण्यात आली. पण या तपासणीला लेटमार्क लागला. त्यामुळे निकाल लागण्यास सप्टेंबर महिना उजाडला. त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना निकाल मिळाले नव्हते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे विधि अभ्यासक्रम आॅक्टोबर महिन्यात सुरू झाला. एलएलएम प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी २७ डिसेंबरला, तर पाचवी यादी १० जानेवारीला जाहीर झाली. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती, तर विद्यापीठाने परीक्षा फक्त ५ दिवसांनी जाहीर केली व विद्यार्थी संतप्त झाले़प्रवेश यादी जाहीर झाल्यावर लगेच परीक्षेची घाईप्रवेश यादी जाहीर करून अवघे काही दिवस झाले असतानाही विद्यापीठाने परीक्षेची घाई केली. विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही. अभ्यासक्रम अपूर्ण आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे मत स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी मांडले.
‘एलएलएम’ परीक्षेवर विद्यार्थ्यांचा बहिष्कार, परीक्षा ५ दिवसांनी पुढे ढकलल्याने नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:05 AM