प्राची सोनवणे, नवी मुंबईबुधवारी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुस-याच दिवसापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. गेल्या वर्षी अभियांत्रिकी शाखेच्या ६४ हजार जागा रिक्त होत्या. यंदा मात्र जागेपेक्षा विद्यार्थी जास्त असल्याचे चित्र पहायला मिळते. राज्य शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार यंदा १ लाख, ३८ हजार , ७४१ जागा उपलब्ध आहेत सीईटीला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ६२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उपलब्ध जागेपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या १ लाख २३ हजार २५१ ने जास्त असल्याने प्रवेशासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे इंजिनीयरिंंग प्रवेश जाहीर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना सर्व सुविधा केंद्रांवर रविवार व सुट्टीच्या दिवशीही अर्ज करता येतील. गुरुवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रि या १६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. डीटीईचे संचालक सु. का. महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवेश बेटरमेंटच्या संधीतून प्रवेश निश्चित करण्यासाठी विदयार्थ्याना स्लाईड, फ्लोट ,फ्रीझ यासारखे पर्याय निवडावा लागणार आहे. तसेच चौथ्या फेरीपर्यंत प्रवेश भरण्याची संधी यंदा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संस्था स्तरावरील प्रवेशासाठीही राज्य सामाईक प्रवेश कक्षाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत नाव असणे अनिर्वाय आहे. स्पर्धा वाढली असल्याने विद्यार्थ्यांना सामाईक सीईटीनंतरही प्रवेशासाठी चढाओढ करावी लागणार आहे. मध्यंतरी झालल्या नीटच्या घोळामुळे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचाौ प्रचंड गोंधळ उडाला असून आता पुन्हा प्रवेशासाठी धांदल उडणार असून त्यातील काही विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या बाबतीत संभ्रमात असून बीएससीकडे धाव घेतल्याचे दिसून येते. बारावीनंतर अनेक पर्याय आता उपलब्ध असूनही इंजिनियरींग आणि मेडिकलीच विद्यार्थ्यांमधील क्रेझ मात्र त्यामानाने कमी झाली नाही असे स्पष्ट होते. मिशन अँडमिशनमुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकही तितकेच उत्सुक आहेत.प्रवेश प्रक्रियाआॅनलाईन अर्ज : २ ते १६ जूनकागदपत्र तापासणी, सुधारणा : २ ते १७ जूनसंभाव्य गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे : १९ जूनपर्यंतयादीतील सुविधा केंद्रांवर हरकती मांडणे : १९ ते २१ जून सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी : २२ जूनपर्यंत
अभियांत्रिकीसाठी विद्यार्थ्यांची कसरत
By admin | Published: June 04, 2016 1:39 AM