हुशार विद्यार्थी झाले नापास, विधि अभ्यासक्रमाच्या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 02:26 AM2017-09-03T02:26:19+5:302017-09-03T02:26:30+5:30

मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असल्याने विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने कंबर कसून विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले.

Students fail to become clever students, students suffer due to confusion about law curriculum | हुशार विद्यार्थी झाले नापास, विधि अभ्यासक्रमाच्या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त

हुशार विद्यार्थी झाले नापास, विधि अभ्यासक्रमाच्या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असल्याने विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने कंबर कसून विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले. पण अजूनही विद्यार्थ्यांची चिंता कमी झालेली नाही. कारण, टॉपर्स असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालावर नापासचा शिक्का बसला आहे.
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी सुरू केली, पण या पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेला लेटमार्क लागला आहे. अजूनही सप्टेंबर महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या साठ हजारहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. त्यातच आता निकाल लावूनही त्यात चुका असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
विधि अभ्यासक्रमाचे निकाल विद्यापीठाने घाईघाईने जाहीर केले आहेत. पण या निकालांमध्ये आधीच्या परीक्षेत चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना नापासचा शिक्का बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका केंद्रावर असलेले अनेक विद्यार्थी एकाच विषयात नापास झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले आहेत. त्यातच आता नापासचा शिक्का बसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यामुळे आता विद्यार्थी परीक्षा भवनात फेºया मारत आहेत. पण हाती काहीच येत नाही.

पुनर्तपासणीची मागणी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ सुरू आहे. नापास विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीसाठी समिती नेमावी. तसेच लवकरात लवकर या विद्यार्थ्यांचे निकाल लावावे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्टुण्डट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली.

Web Title: Students fail to become clever students, students suffer due to confusion about law curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.