हाय कटआॅफमुळे विद्यार्थी नाराज

By admin | Published: July 2, 2017 06:46 AM2017-07-02T06:46:35+5:302017-07-02T06:46:35+5:30

बारावीत उत्तीर्ण झालेल्या, पण ५० ते ७० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी काही प्रमाणात निराशा आली आहे. कारण, मुंबई विद्यापीठाशी

Students get angry because of high cutoff | हाय कटआॅफमुळे विद्यार्थी नाराज

हाय कटआॅफमुळे विद्यार्थी नाराज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीत उत्तीर्ण झालेल्या, पण ५० ते ७० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी काही प्रमाणात निराशा आली आहे. कारण, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या नामांकित महाविद्यालयांच्या तिसऱ्या यादीचा कटआॅफ हा ८० ते ८५ दरम्यानचा आहे. त्यामुळे यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग बंद झाला आहे.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता महाविद्यालयांमध्ये तिसरी यादी जाहीर झाली. नामांकित महाविद्यालयांत टक्केवारी खाली न उतरल्याने शेकडो विद्यार्थ्यांना मनाला मुरड घालत अन्य महाविद्यालयांकडे मोर्चा वळवायला लागला आहे. अनेक महाविद्यालयांनी ९२ ते ७० दरम्यान आपली
तिसरी गुणवत्ता यादी असल्याचे जाहीर केले. मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत ९ लाख ३१ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Web Title: Students get angry because of high cutoff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.