Join us

विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके

By admin | Published: May 24, 2015 10:55 PM

जिल्हा विभाजनानंतर प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे एक लाख ५० हजार विद्यार्थांना शाळा सुरु होताच पाठ्यपुस्तके देण्याची

पंकज रोडेकर, ठाणेजिल्हा विभाजनानंतर प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे एक लाख ५० हजार विद्यार्थांना शाळा सुरु होताच पाठ्यपुस्तके देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती जि.प.च्या शिक्षण विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ३७४ शाळा असून तेथे जवळपास एक लाख ५० हजार विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनुदानित खासगी शाळा, आश्रम शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा आणि समाज कल्याण विभागाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके तसेच स्वाध्याय पुस्तिका देण्यात येतात. तसेच समाज कल्याण विभागाच्या शाळा, आश्रमशाळा आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना यावर्षी पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके हाती पडणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. स्वाध्याय पुस्तिका शाळा सुरु झाल्यानंतर आठ दिवसात वितारित केली जाणार आहे.