विद्यार्थ्यांना व्हाॅट्सॲपमधून मिळाले सर्वाधिक धडे ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:06 AM2021-05-12T04:06:55+5:302021-05-12T04:06:55+5:30

राज्यातील शाळांनी स्वाध्यायपुस्तिका, गृहभेटी, ऑनलाइन /ऑफलाइन चाचण्यांतूनही मुलांना शिकविल्याची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील एकूण २५ हजार ...

Students got the most lessons from WhatsApp ... | विद्यार्थ्यांना व्हाॅट्सॲपमधून मिळाले सर्वाधिक धडे ...

विद्यार्थ्यांना व्हाॅट्सॲपमधून मिळाले सर्वाधिक धडे ...

Next

राज्यातील शाळांनी स्वाध्यायपुस्तिका, गृहभेटी, ऑनलाइन /ऑफलाइन चाचण्यांतूनही मुलांना शिकविल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील एकूण २५ हजार ९२७ माध्यमिक शाळांपैकी १२ हजार ९३१ शाळांनी आपला ऑनलाइन / ऑफलाइन अध्ययनाचा अहवाल एससीईआरटीकडे जमा केला असून, शाळांनी ऑनलाइन चाचण्या, ऑनलाइन वर्ग, गृहभेटी, स्वाध्यायपुस्तिका, ऑफलाइन चाचण्या अशा विविध माध्यमांतून अध्यापन केल्याची माहिती दिली आहे. यामध्ये सर्वाधिक अध्यापन हे व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून झाले असून, तब्बल १२ हजार २९८ शाळांनी ते केले आहे. अनेक शाळांमध्ये एकापेक्षा अनेक पद्धती अध्यापनासाठी वापरल्या आहेत. ९ हजार ७५८ शाळांनी ऑनलाइन चाचण्या तर ९ हजार ९३० शाळांनी ऑफलाइन चाचण्याही घेतल्या असल्याची माहिती दिली आहे. ८ हजार ४०२ शाळांनी स्वाध्यायपुस्तिकांचा वापर केला, तर गृहभेटीतून ७ हजार ३५२ शाळांनी अध्यापन केले असल्याची माहिती दिली आहे.

ऑनलाइन ऑफलाइन अध्ययन आणि अध्यापन अहवाल नोंदणीची सुविधा एससीईआरटीमार्फत शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याच्या निरीक्षण नोंदीवरून राज्यातील ५० टक्के शाळांनी ऑनलाइन अध्यापनाचा आपला अहवाल शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमांतून ऑनलाइन शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षण विभागाने ही पुढाकार घेतला होता. शाळांनीही एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता मुलांना शिकविण्यासाठी विविध पद्धतींची मदत घेतली. ८ हजार ४०१ शाळांनी ऑनलाइन वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे दिले असल्याची माहिती त्यांनी नोंदवली आहे. वरील सर्व पद्धतींशिवाय ३ हजार ६४३ शाळांनी आणखी वेगळ्या पद्धतींचा वापर केल्याचीही माहिती नोंदवली आहे.

चौकट

वर्षभर अशाच विविध माध्यम आणि पद्धतींनी केलेल्या अध्यापनामुळेच शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या सर्वेक्षणातही दहावीचे अंतर्गत मूल्यमापन शाळास्तरावर करण्यासाठी शाळांनीही अनुकूलता दर्शविली आहे.

दहावीचे अंतर्गत मूल्यमापन शाळास्तरावर होऊ शकेल का, याबाबतची चाचपणी शिक्षण विभागाकडून होत असताना तब्बल १७ हजार ४८७ शाळांनी यासाठी आपली संमती दर्शविली आहे. या उलट ३ हजार ६२३ शाळांनी आपण शाळास्तरावर मूल्यमापनासाठी तयार नसल्याचे मत सर्वेक्षणात नोंदविले आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी राज्यातील २१ हजार ११० शाळांनी आपली मते सर्वेक्षणात नोंदविली आहेत. एकूणच राज्यातील जवळपास ८३ टक्के शाळा या दहावीचे अंतर्गत मूल्यमापन शाळास्तरावर करण्यासाठी तयार आहेत.

---------

महत्त्वाच्या जिल्ह्यांची अध्यापनपद्धती

जिल्हा - माहिती सादर केलेल्या शाळा (टक्केवारीमध्ये) - पद्धती

व्हॉट्सॲप- ऑनलाइन चाचणी- ऑफलाइन टेस्ट- स्वाध्याय

-पुणे - ४०. ३४- ७५५-६५२- ५७९- ४८०

मुंबई - ७१. ९८- ७४९-७३१- ६१४- ५९१

नागपूर - ४०. ३६- ४४१-३०३- ३३३- ३११

नंदुरबार- ७२. ८९ - २४८-१४९- २५६- १९२

ठाणे - २४. २३- ३३७- ३००- २२८- २१०

नाशिक - ६१. ९५ - ७१४- ५८६- ६१७- ५०५

कोल्हापूर - ६२. ७०- ६००- ५०९- ५०१- ४२७

Web Title: Students got the most lessons from WhatsApp ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.