Join us

मेट्रो-३ मार्गिकेवरील स्थानकांचा आराखडा बनविण्याची विद्यार्थ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 1:01 AM

विद्यार्थ्यांना पारितोषिकही मिळणार

मुंबई : कुलाबा वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) करण्यात येत आहे. या मार्गिकेवर प्रस्तावित असलेल्या स्थानके कशी असतील, याबाबतचा आराखडा तयार करण्याची संधी आता विद्यार्थांना मिळणार आहे. एमएमआरसीने यासाठी विद्यार्थांकडून आराखडा मागवण्यात आले आहेत. यातून चांगले आराखडा निवडण्यात येणार असून, त्यांना चांगले बक्षीसही देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.मेट्रो-३ मार्गिकेच्या स्थानकाचा आराखडा बनविण्यासाठी अभियांत्रिकी, वास्तुविशारद, शहर नियोजन, वाहतूक, वाहतूक नियोजन अशा विविश शैक्षणिक संस्था किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत, असलेल्या विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी metro3competition@gmail.com या संकेतस्थळावर मेल पाठवू शकतात. यासाठी एमएमआरसीतर्फे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थांना आवश्यक नकाशा आणि माहिती पुरविण्यात येणार आहे.पारितोषिकही मिळणारमेट्रो-३ मार्गिकेवर असलेल्या प्रस्तावित स्थानकांपैकी कोणत्याही एका स्थानकाचा आराखडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्याला बनवायचा आहे. यासाठी त्यांना या प्रस्तावित स्थानकाच्या कामाच्या ठिकाणीही येता येणार आहे. प्रत्येक स्थानकाच्या आराखड्यातून तीन संघांची निवड करण्यात येणार असून, त्यांना पारितोषिकेही देण्यात येणार असल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मेट्रो