Join us  

विद्यार्थ्यांची खंत : बारावीसाठी महाविद्यालय बदलणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:53 AM

बारावीला महाविद्यालय बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी आॅनलाइन नोंदणी करून, प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाण्याचे आदेश शासनाने दिले होते

मुंबई : बारावीला महाविद्यालय बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी आॅनलाइन नोंदणी करून, प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाण्याचे आदेश शासनाने दिले होते. यंदा अद्याप तसे शासन आदेश न आल्याने पालक आणि विद्यार्थी गोंधळले आहेत. बारावीसाठी महाविद्यालय बदलणे कठीण झाल्याची खंत विद्यार्थ्यांमध्ये आहे.महाविद्यालयीन प्रशासन पालक व विद्यार्थ्यांना प्रक्रियेसाठी शिक्षण उपसंचालक विभागाच्या फेºया मारण्यास लावत असल्याचे प्रकारही दिसून आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने तत्काळ या संबंधित आदेश काढावेत, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.अकरावीला मनाजोगे महाविद्यालय न मिळाल्यामुळे, बारावीला महाविद्यालय बदलण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. त्यातही बºयापैकी गैरप्रकाराला वाव असतो. परिणामी, मागील वर्षी काही मार्गदर्शक सूचनांसह शासनाने हे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, यंदा अद्याप आदेश न आल्याने बारावीचे प्रवेश खोळंबले असल्याच्या तक्रारी येत आहेत. महाविद्यालय बदलायचे असल्यास, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून तसे पत्र घेऊन येण्यास पालकांना अनेक महाविद्यालये सांगत आहेत. त्यामुळे ठाणे, वाशी, डोंबिवली अशा ठिकाणांहून विद्यार्थी उपसंचालक कार्यलायात हेलपाटे घालत आहेत. अधिकारी त्यांना योग्य मार्गदर्शन करून महाविद्यालयांना जाब विचारत असले, तरी पालकांनाच त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतअसल्याची तक्रारही पालकांनीकेली.दरम्यान, दोन-तीन दिवसांत या प्रकरणी शासन आदेश निघण्याची शक्यता शिक्षण विभागातून वर्तविण्यात येत आहे.