Join us

छात्रभारतीचे सायन रेल्वे स्टेशनात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2016 8:54 PM

टीसीकडून वि़द्यार्थीनीला झालेल्या मारहाणीच्या विरोधात आज छात्रभारतीच्या वि़द्यार्थ्यांनी सायन रेल्वे स्टेशनात आंदोलन केले.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १ - टीसीकडून वि़द्यार्थीनीला झालेल्या मारहाणीच्या विरोधात आज छात्रभारतीच्या वि़द्यार्थ्यांनी सायन रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालबाहेर निदर्शने करुन परिसर दणाणून सोडला. बुधवार दि. २८ सप्टेंबर २०१६ रोजी सायन रेल्वे स्टेशन येथे रेल्वे पास घरी विसरल्याने कुमारी दर्शना पवार हिला टीसी कविता तांबे यांनी मारहाण केली. 
दंड भरण्यासाठी तयार असताना सुद्धा तिला मारहाण करण्यात आली. सदर घटना रेल्वे स्टेशनवरील उपस्थित असलेल्या प्रवाशांनी बघितली. त्यांनी टीसी कविता तांबे यांना रोखण्याचा प्रयत्न वेत्र्ला. तरीही मग्रूरीत असलेल्या तांबे यांनी वुत्र्णालाही जुमानले नाही. या टीसीने उलट आरोप करुन पीडीत विद्यार्थिनीने मला मारहाण वेत्र्ल्याचे सांगितले. सायन रेल्वे पोलिस स्टेशनकडे सीसीटीव्ही फुटेज मागितलं असता त्यांनी देण्यास नकार दिला. 
वि़द्यार्थ्यांवर खोटे आरोप करुन वेठीस धरण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला याचा छात्रभारतीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. तसेच दर्शना पवार हिने टीसी विरोधात तक्रार मागे घ्यावी यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासन दबाब टाकत असल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. 
या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि कविता तांबे यांचे निलंबन व्हावे या मागणीसाठी छात्रभारतीच्या वि़द्यार्थ्यांनी आज निदर्शने वेत्र्ली. याप्रसंगी सुमारे १५० ते २०० वि़द्यार्थी या निदर्शनास सामिल झाले होते. निदर्शक करणार्‍या वि़द्यार्थ्यांनी आपले निवेदन सायन रेल्वे स्टेशन उप प्रबंधक श्री. पाल यांच्याकडे सादर वेत्र्ले. सोबतच रेल्वे प्रशासनाने वि़द्यार्थ्यांशी तसेच सामान्य प्रवाशांशी सौजन्याने व्यवहार केला पाहिजे अशी मागणी देखील निवेदनात वेत्र्ली आहे. निवेदन घेताना पी. आय. बोबडे, दादर रेल्वे जनसंपर्क अधिकारी आहिरे उपस्थित होते. 
या निवेदनावर मुंबई छात्रभारतीचे अध्यक्ष सागर भालेराव, उपाध्यक्ष प्रणय साळवी, मुंबई संघटक रोहित ढाले, विशाल कदम, सचिव वेत्र्तकी महाजन यासर्वांच्या सह्या आहेत. या निमित्ताने मुंबई व मुंबई उपनगरातील सर्व वि़द्यार्थ्यांना मोफत रेल्वे प्रवास करण्याची मागणी छात्रभारतीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्राद्वारे वेत्र्ली आहे. येणार्‍या काळात या मागण्यांसाठी छात्रभारती वि़द्यार्थी संघटना काम करणार असल्याचे जाहीर केले.