Join us  

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचेही लक्षवेधी यश

By admin | Published: June 18, 2014 4:09 AM

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनीही दहावीच्या परीक्षेमध्ये लक्षवेधी यश मिळविले आहे. ९६.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

नवी मुंबई : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनीही दहावीच्या परीक्षेमध्ये लक्षवेधी यश मिळविले आहे. ९६.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोपरखैरणेमधील हिंदी माध्यमिक शाळेतील अंकिता शालीकराम तिवारी हिने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. शहरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोफत माध्यमिक शिक्षण मिळवून देण्यासाठी महापालिकेने प्रत्येक विभागनिहाय माध्यमिक शाळा सुरू करण्याचे धोरण आखले आहे. सद्यस्थितीमध्ये १२ शाळा सुरू केल्या आहेत. पहिल्या वर्षीपासून पालिका शाळेतील विद्यार्थी चांगले यश मिळवू लागले आहेत. यावर्षीही यशाची परंपरा कायम राखली आहे. मनपा शाळांमध्ये ११७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील ११३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोपरखैरणेमधील हिंदी माध्यमाच्या शाळेतील अंकिता तिवारी हिने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच शाळेतील ब्युटी अशोक गौड हिने ९१.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जयश्री कृष्णात दरेकर हिने ९१ टक्के गुण मिळवून तृतीय व मराठी माध्यमात प्रथम क्रमांक मिळविला आहे. रामेश्वर इंगळे याने ९०.८० टक्के मिळवून चौथा क्रमांक मिळविला .