Join us  

सायन्स एक्स्प्रेससाठी विद्यार्थ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 3:20 AM

रेल्वे मंत्रालयाची बहुउद्देशीय सायन्स एक्स्प्रेस बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल झाली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एक्स्प्रेसचे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेल्वे मंत्रालयाची बहुउद्देशीय सायन्स एक्स्प्रेस बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल झाली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एक्स्प्रेसचे उद्घाटन केले. मुंबईत पहिल्याच दिवशी एक्स्प्रेस पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. परिणामी, पहिल्या दिवशी एक्स्प्रेससाठी विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. ही एक्स्प्रेस २२ जुलैपर्यंत विज्ञानप्रेमींसाठी खुली राहणार आहे. पहिल्या दिवशी ५३ शाळेतील ५ हजार ८०७ विद्यार्थ्यांसह एकूण १९ हजार ३३ विज्ञानप्रेमींनी भेट दिली.विज्ञानविषयक रंजक गोष्टींचा वेध घेणारे प्रयोग, हवामानातील बदल अशा विविध गोष्टींचा उलगडा सायन्स एक्स्प्रेसच्या १६ वातानुकूलित बोगींतून दाखविण्यात येणार आहे. पर्यावरणाबाबत जनतेमध्ये जागृती व्हावी, ग्लोबल वॉर्मिंन विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी या एक्स्प्रेसची बांधणी करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने २००७ रोजी ही एक्स्प्रेस तयार केली. ही एक्स्प्रेस १७ फे ब्रुवारी ते ८ सप्टेंबर या कालावधीत देशभरातील ६८ स्थानकांवर जाणार आहे. ही एक्स्प्रेस २२ जुलैपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १० वर आहे. ही सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भेटीसाठी खुली असेल. ही भेट मोफत असून, त्यासाठी फलाट तिकिटाचीही आवश्यकता नसल्याचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. पहिल्या ते बाराव्या कोचमध्ये पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खास बालविभागही तयार करण्यात आला आहे.