महारोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:08 AM2017-08-01T03:08:30+5:302017-08-01T03:08:30+5:30
मराठा मंदिरचे बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट स्टडिजमध्ये महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मुंबई : मराठा मंदिरचे बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट स्टडिजमध्ये महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. फ्रेशर्सजॉबफेयर इनने मेळाव्याचे आयोजन केले होते. यात दोन लाख वीस हजार ई-मेल, सत्तर हजार बल्क एसएमएस आणि सुमारे एक हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
इन्फोसिसपासून रिलायन्स, बजाज अलायन्स, युरेका फोर्ब्स, जिंदाल इलेक्ट्रिकल, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अपोलो हेल्थ, अॅक्सिस, जेटकिंग, कोटक महिंद्र, एनआयआयटी, सीड, ग्लोबल इन्फोसिस लिमिटेड, इंटरनेट ग्लोबल सर्व्हिस, कॅटलिस्ट टॅलेंट मॅनेजमेंट, सिनर्जी ग्लोबल, टाटा सस्टेनेबिलिटी ग्रुप, लेन्सकार्ट अशा ४४ नामांकित कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.
मेळाव्यात सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, आयटी ट्रेनी, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स, फायनान्स, अकाउंट्स, आॅपरेशन, एचआर, फॅसिलिटी, सेल्स, मार्केटिंग, कस्टमर सपोर्ट, इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस, नॉन व्हॉइस प्रोसेस, टेक्निकल सपोर्ट, बीपीओ, बॅक आॅफिस, डिजिटल मार्केटिंग रिटेल सेल्स, सेल्स कोआॅर्डिनेटर, बिझनेस डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपर ग्राफिक्स, डिझायनर, फार्मासिटी हेल्थ केअरच्या नोकºया उपलब्ध होत्या. प्रथम फेरीत ४० टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली, अशी माहिती मराठा मंदिर संस्थेचे सचिव विनायक घाग, संचालिका डॉ. विद्या हतंगडी, प्राचार्य डॉ. दिलीप जयस्वाल, प्रियदर्शन पाटील यांनी दिली.