धक्कादायक! 'या' शहरात आठवड्याला 40 बलात्कार व्हिडीओ पाहतात विद्यार्थी - सर्व्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 09:50 AM2019-09-18T09:50:26+5:302019-09-18T09:51:25+5:30

पॉर्न बघण्याची सवय आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी रेस्क्यू रिसर्च अँन्ड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्टकडून हा सर्व्हे करण्यात आला

Students See 40 Rape Videos In Week In Mumbai Says Survey | धक्कादायक! 'या' शहरात आठवड्याला 40 बलात्कार व्हिडीओ पाहतात विद्यार्थी - सर्व्हे 

धक्कादायक! 'या' शहरात आठवड्याला 40 बलात्कार व्हिडीओ पाहतात विद्यार्थी - सर्व्हे 

Next

मुंबई - दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या बलात्काराच्या घटना आणि पॉर्न बघणाऱ्यांची संख्या यावरुन अनेकदा वाद होताना पाहायला मिळतात. मात्र एका सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत दर आठवड्याला बलात्कारवर आधारित 40 व्हिडीओ विद्यार्थी पाहत असतात. इतकं नाही तर ते स्वत:ला या घटनांचा भाग असल्याचं भासवतात. 63 टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे की, हिंसक पॉर्न व्हिडीओ पाहताना ते स्वत:ला याचा भाग असल्याचं भासवतात. मुंबईत 500 विद्यार्थ्यांवर झालेल्या सर्व्हेतून हे समोर आलं आहे. 

पॉर्न बघण्याची सवय आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी रेस्क्यू रिसर्च अँन्ड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्टकडून हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेचं मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांकडून बघण्यात येणारे हार्ड कोर पॉर्न आणि त्याचा मुलांच्या वागण्यावर होणारा परिणाम काय आहे हे जाणून घेणं होता. रिपोर्टनुसार पॉर्न व्हिडीओ बघितल्यामुळे स्वत:चा न्यूड फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं समोर येतंय.

सर्व्हेनुसार 33 टक्के मुले आणि 24 टक्के मुली पॉर्न व्हिडीओ पाहिल्यानंतर सेक्सटिंग फोटो शेअर करतात. तर 35 टक्के विद्यार्थी व्हिडीओ पाहून स्वत:ला सेक्सुअल एक्टिविटीशी जोडून घेतात. तसेच यामुळे अल्पवयीन मुलींचे अबॉर्शन करण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याची धक्कादायक खुलासाही झाला आहे. 

46 टक्के तरुण पाहतात पॉर्न व्हिडीओ
केंद्र सरकारकडून अनेक पॉर्न व्हिडीओ साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही पॉर्न व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. 46 टक्के युवा वर्ग पॉर्न पाहत असल्याचं समोर आलं आहे. तर 8 मुलींपैकी एक मुलगी पैशांसाठी शरीर सौदा करण्यासाठी तयार झाली असल्याचं सांगण्यात आलं. 

Image result for Students See 40 Rape Videos In Week In Mumbai Says Survey

रेस्क्यू रिसर्च अँन्ड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक क्लीफर्डने सांगितले की, हा रिपोर्ट चिंता वाढविणारा आहे. पॉर्नोग्राफी कॅन्सरमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊन मानवी मनावर नकारात्मक परिणाम घडत आहेत. तर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी वैवाहिक जीवनावर पॉर्न व्हिडीओ बघितल्यानंतर नकारात्मक परिणाम पडतो. तसेच बलात्कार व्हिडीओ पाहून लोकांच्या मनामध्ये ही सामान्य गोष्ट बनून जाते त्यामुळे समाजासाठी हा चिंतेचा विषय आहे. 

अभिषेक क्लीफर्डने सांगितले की, हार्डकोर पॉर्न व्हिडीओ पाहून लोकांमध्ये ओरल सेक्ससाठीही मागणी वाढत आहे. त्यामुळे एचआयव्हीसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता बळावते. कॉलेज विद्यार्थ्यांना याबाबत ज्ञान नाही हे आश्चर्यकारक आहे. या सर्व्हेसाठी मुंबईतील 30 इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या 500 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. यात 188 मुले तर 345 मुली होत्या. सर्व विद्यार्थ्यांचे वय 16-22 वयोगटात होते. 
 

Web Title: Students See 40 Rape Videos In Week In Mumbai Says Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.