विद्यार्थ्यांच्या जॉब ऑफर्स रद्द करू नयेत ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 06:50 PM2020-04-10T18:50:59+5:302020-04-10T18:51:27+5:30

केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचे कंपन्यांना आवाहन; विद्यार्थी देशाची बौद्धिक संपदा असल्याचे व्यक्त केले मत...

Students should not cancel job offers ...! | विद्यार्थ्यांच्या जॉब ऑफर्स रद्द करू नयेत ...!

विद्यार्थ्यांच्या जॉब ऑफर्स रद्द करू नयेत ...!

googlenewsNext

मुंबई : कोरोनामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीचा फटका देशभरातील गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून कॅम्पस मुलाखतींमध्ये विद्यार्थ्यांना दिलेले नोकरीचे प्रस्ताव अनेक कंपन्या मागे घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कंपन्यांना मी विद्यार्थ्यांना दिलेल्या जॉब ऑफर्स रद्द करू नयेत असे आवाहन मनुष्यबळ विकास विभाग मंत्री निशांक पोखरियाल यांनी केले असल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे. त्याचप्रमाणे जॉब ऑर रद्द झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या आयआयटी स्पेशल प्लेसमेंट ड्राइव्ह राबविणार आहेत, त्यांना तात्पुरती स्थगिती देण्यास सांगितले असल्याची माहितीही दिली आहे. हे विद्यार्थी म्हणजे देशाची बौद्धिक संपदा असून ते कठीण परिस्थितीत देशाला संशोधनात मदत करू शकत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

यंदा आयआयटी बॉम्बे , आयआयटी हैद्राबाद सारख्या  आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांना चान्गल्या प्लेसमेंट मिळाल्या , ऑफर लेटर्स ही हातात आले  मात्र आता या जॉब ऑफर्स कायम राहतात की नाही ही चिंता विद्यार्थ्यांना स्टेव्हयू लागली आहे. अनेक कॅम्पस मुलाखतींचे प्रस्ताव कंपन्यांकडून मागे घेण्यात येत आहेत.  या परिस्थितीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही नुकतीच बैठक घेतली. आयआयटी, आयआयएम यांसह देशभरातील आघाडीच्या शिक्षणसंस्थांमधील निवड झालेले विद्यार्थी हे सक्षम मनुष्यबळ आहे. त्यांना दिलेले प्रस्ताव नाकारण्यात येऊ नयेत अशी कंपन्यांना विनंती करावी, त्याचप्रमाणे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यासाठी आयआयटीनी आराखडा तयार करावा अशा सूचना शिक्षणसंस्थांना देण्यात आल्या आहेत. आपल्या आयआयटीमधील संबंधित समन्वयक नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात आहेत आणि विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरीची संधी लॉकडाऊननंतरही तशीच राहावी, यासाठी ते प्रयत्नात आहेत.

लॉकडाऊनमुळे यापूर्वी झालेल्या प्लेसमेंटवर फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. परंतु विद्यार्थ्यांना दिलेल्या पॅकेजमध्ये आणि कामावर रूजू होण्याचा कालावधीत बदल होऊ शकतो असे एका प्राध्यापकाने प्लेसमेंटवर आपले मत व्यक्त करताना प्रतिक्रिया दिली.  सरासरी वेतनात वाढ, मोठय़ा पगाराच्या नोकऱ्या आणि नोकरी देऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांची वाढलेली संख्या यांमुळे विद्यार्थी सुखावले होते मात्र रद्द होणाऱ्या जॉब ऑर्समुळे ते बरेच धास्तावले असल्याची प्रतिक्रिया सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने दिली. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या आवाहनानंतर कंपन्या जॉब ऑफर रद्द करण्यापूर्वी  करतील अशी सकारात्मक अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

Web Title: Students should not cancel job offers ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.