‘ॲल्युमनी कनेक्‍ट’द्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांशी जाेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:07 AM2021-01-23T04:07:17+5:302021-01-23T04:07:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशातील शिक्षण संस्थांचा दर्जा जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी सेलची ताकद ...

Students will be connected to educational institutions through ‘Alumni Connect’ | ‘ॲल्युमनी कनेक्‍ट’द्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांशी जाेडणार

‘ॲल्युमनी कनेक्‍ट’द्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांशी जाेडणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील शिक्षण संस्थांचा दर्जा जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी सेलची ताकद उपयोगी ठरू शकते. या हेतूने आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना माजी विद्यार्थ्यांशी जोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठांमधील ‘ॲल्युमनी सेल’ची माहिती माजी विद्यार्थ्यांना कळविण्याची सूचना केली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थांना जागतिक पातळीवर पोहोचविण्यावर भर दिला आहे. येत्या काही वर्षांत देशाला जागतिक अभ्यास केंद्र बनविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. म्हणूनच शैक्षणिक संस्थांमधील माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शैक्षणिक संस्थांना आर्थिक आणि त्याव्यतिरिक्त योगदानही त्यांच्याकडून मिळू शकते. तसेच देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेले परदेशी विद्यार्थी आणि सध्या परदेशात असलेले भारतीय विद्यार्थी हेदेखील शैक्षणिक संस्थांच्या ‘ब्रॅण्ड बिल्डिंग’साठी हातभार लावू शकणार आहेत, असे आयोगाचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी सूचनेद्वारे सांगितले.

विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांशी जोडून घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘ॲल्युमनी कनेक्‍ट’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून विविध विद्यापीठांमधील माजी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या संघटनांची माहिती संकलित करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील घडामोडींत सहभागी करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच विद्यापीठांमधील ‘ॲल्युमनी सेल’ची माहिती १५ फेब्रुवारीपूर्वी द्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.

----------------------

Web Title: Students will be connected to educational institutions through ‘Alumni Connect’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.