Join us

विद्यार्थ्यांना करावी लागणार कसरत

By admin | Published: May 03, 2015 10:53 PM

वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच-सीईटी-२०१५ ही सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवारी ७ मे रोजी अलिबाग तालुक्यातील नऊ केंद्रांवर होत आहे.

अलिबाग : वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच-सीईटी-२०१५ ही सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवारी ७ मे रोजी अलिबाग तालुक्यातील नऊ केंद्रांवर होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील तीन हजार ६५० विद्यार्थी पात्र आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून परीक्षेला सुरुवात होणार असून हा दिवस कार्यालयीन कामकाजाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागणार आहे.शैक्षणिक वर्ष २०१५-१६ या वर्षाकरिता आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी मुंबईच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. राज्यातून एक लाख ९४ हजार ४८७ विद्यार्थी बसणार आहेत. राज्यातील ५०६ कनिष्ठ महाविद्यालये परीक्षा केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत.