वीजचोरांविरुद्धच्या मोहिमेचा अभ्यास!
By Admin | Published: July 21, 2014 11:32 PM2014-07-21T23:32:54+5:302014-07-21T23:32:54+5:30
वीजचोरांविरुद्ध विविध मोहिमा आणि इतर पद्धतीने धडक कारवाई करण्यात येते.
मुंबई : वीजचोरांविरुद्ध विविध मोहिमा आणि इतर पद्धतीने धडक कारवाई करण्यात येते. या कृती कार्यक्रमाद्वारे वीजचोरी कमी करण्याच्या महावितरणच्या या पद्धतीचा अभ्यास राजस्थान विद्युत वितरण कंपनीच्या दक्षता विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम. कुर्मी आणि पोलीस उपअधीक्षक त्रिलोकी नाथ शर्मा यांनी नुकताच पूर्ण केला आहे.
या पथकाने प्रकाशगड येथील माहिती तंत्रज्ञान, वाणिज्य, सांघिक संवाद आणि दक्षता व सुरक्षा विभागांच्या वरिष्ठ अधिका:यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून महावितरणने वीजचोरीविरुद्ध राबविलेल्या मोहिमेची माहिती समजावून घेतली. तसेच महावितरणचे भरारी पथक आणि दक्षता विभाग, वीजचोरांविरुद्ध कशा पद्धतीने काम करते, याची प्रत्यक्ष पाहणी पुणो आणि कल्याण परिमंडळात जाऊन केली. या दौ:यादरम्यान त्यांनी दक्षता
आणि सुरक्षा विभागाचे प्रभारी संचालक शिवाजी इंदलकर यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चाही केली. दरम्यान, महावितरणने मागील काही वर्षात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबवून वीज वितरण हानी लक्षणीय प्रमाणात कमी केली आहे. 2क्क्4-क्5 साली महावितरणची वीज वितरण हानी 35 टक्के होती; ती आता 14 टक्क्यांर्पयत खाली आली आहे. (प्रतिनिधी)