शाळा बंद तरी अभ्यास सुरूच... !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:04 PM2020-05-20T18:04:00+5:302020-05-20T18:04:36+5:30

स्टडी फ्रॉम होममुले कंटाळलेल्या विद्यार्थी शिक्षकांकडून उन्हाळी सुट्टीची होत आहे मागणी

Study continues even after school closes ...! | शाळा बंद तरी अभ्यास सुरूच... !

शाळा बंद तरी अभ्यास सुरूच... !

Next


मुंबई : राज्यातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शिक्षणसंस्थांना आणि शाळांना लर्न फ्रॉम होमच्या सूचना शिखरं विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पालिका शाळांतील  शिक्षक, अनुदानित, विनाअनुदानित खाजगी शाळांतील शिक्षक हे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लेक्चर्स घेऊन अभ्यास घेत आहेत. मात्र लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होऊन मे महिना संपत आला तरी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मात्र न मिळाल्याने शिक्षक आणि विद्यार्थी असे दोन्ही वर्ग आता वातागले असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिक्षण विभागाचा शाळा बंद अभ्यास सुरु हा वर्ग अजून किती दिवस चालू राहणार असा प्रश्न विद्यार्थी शिक्षक विचारू लागले आहेत. शिक्षण विभागाने किमान पुढील शैक्षणिक वर्षाची घोषणा करून त्या आधी काही दिवस उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी विद्यर्थी शिक्षक करू लागले आहेत.

पुढील शैक्षणिक वर्षाची कोणतीही कल्पना न देता शिक्षकांना स्टडी फ्रॉम होमसाठी शैक्षणिक व्हिडीओ तयार करण्याचे तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र हे करताना सगळ्याच विद्यर्थ्यांकडे ऑनलाईन लर्निंगसाठी आवश्यक सुविधा असतीलच असे नाही याचा विचार केलेला नाही. त्यामुळे एका ठराविक विद्यर्थी समूहाला शिकविताना इतर विदयार्थ्यांच्या बाबतीत काय करायचे याची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही , त्यामुळे शिक्षकांना सगळ्या विद्यर्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करून घ्यायचा याचे कोडे पडले असल्याची प्रतिक्रिया लोकशाही शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली. अनेक शाळांतील विद्यार्थी ही आपल्या गावी स्थलांतरित झाल्याने त्यांच्या ही अनुपस्थितीचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली. लर्न फ्रॉम होम उपक्रम ही किती दिवस चालू ठेवायचा ? विद्यर्थी आणि शिक्षक आता कंटाळले असून असून त्यांना आता आरामाची गरज असल्याचे मत व्यक्त करत किमान शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाची माहिती देत उन्हाळी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण , प्रशिक्षण , कोरोना संबंधित कामे, त्याचप्रमाणे शाळांचे पहिली ते आठवी, नववी - अकरावी आणि दहावी बारावीच्या निकालांमधून उसंत घ्यायला ही वेळ नाही. अशा परिस्थितीत आता ऑनलाईन लर्निंगच्या कामातून त्यांना ही सुट्टी आवश्यक असल्याचे मत पंड्या यांनी व्यक्त केले. सुट्टी नाही मिळाली तरी निदान त्यांच्यावरील कामाचे ओझे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केल्यास होऊ शकेल अशी प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्त होत आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थी शिक्षकाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि या दोघांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Study continues even after school closes ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.