खवल्या मांजरांच्या सुरक्षेसाठी अभ्यासगट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:05 AM2021-01-01T04:05:42+5:302021-01-01T04:05:42+5:30

मुंबई : राज्यातील खवल्या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचविण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन ...

Study group for the safety of scaly cats | खवल्या मांजरांच्या सुरक्षेसाठी अभ्यासगट

खवल्या मांजरांच्या सुरक्षेसाठी अभ्यासगट

Next

मुंबई : राज्यातील खवल्या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचविण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा तयार करून राज्य शासनास सादर करील.

राज्य वन्यजीव मंडळाच्या १५व्या बैठकीत खवल्या मांजराच्या संरक्षण, संवर्धनाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीच्या उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वनविभागाने अभ्यासगटाची स्थापना केली आहे. यात वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन आणि वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासगटात दीपक खाडे - उपवनसंरक्षक - चिपळूण-रत्नागिरी, विश्वास काटदरे (भाऊ) - सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ, डॉ. वरद बी. गिरी - संस्थापक संचालक - एनआयडीयूएस, नितीन देसाई - संचालक - सेंट्रल इंडिया वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया, रोहन भाटे - माजी मानद वन्यजीव रक्षक - सातारा यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे, तर सातारा येथील उपवनसंरक्षक डॉ. बी.एस. हाडा हे या अभ्यासगटाचे सदस्य सचिव असतील.

विविध कारणांमुळे खवले मांजरांचा अधिवास धोक्यात आला आहे. खवल्यांसाठी या मांजरीची शिकार होत आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. आता हा अभ्यासगट खवल्या मांजरीचे अधिवास व्यवस्थापन, गुन्हेगारीवर आळा घालणे, गुप्त माहिती मिळविणे, जनजागृती करणे यासारख्या बाबींचा विचार करून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करील. खवले मांजर प्रजातीचा अधिवास, त्यांचे अस्तित्व, त्यांना असलेल्या धोक्यांचा अभ्यास करणे, खवले मांजरीच्या अवैध व्यापाराच्या व्याप्तीचा अभ्यास करणे, अवैध व्यापाराला आळा घालणे, त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना सुचविणे ही या तांत्रिक अभ्यासगटाची कार्यकक्षा असेल.

Web Title: Study group for the safety of scaly cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.