उपनगरात रिमझिम; मुंबईकडे पाठ, उष्ण वाऱ्यांचा जोर वाढल्याचा मान्सूनवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 06:32 IST2018-06-17T06:32:50+5:302018-06-17T06:32:50+5:30
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी पुनरागमन केले. मात्र, सकाळसह दुपारी पूर्व आणि पश्चिम उपनगरात रिमझिम बरसणा-या पावसाने मुंबई शहरात संध्याकाळनंतर काही ठिकाणी शिडकावा केला.

उपनगरात रिमझिम; मुंबईकडे पाठ, उष्ण वाऱ्यांचा जोर वाढल्याचा मान्सूनवर परिणाम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी पुनरागमन केले. मात्र, सकाळसह दुपारी पूर्व आणि पश्चिम उपनगरात रिमझिम बरसणा-या पावसाने मुंबई शहरात संध्याकाळनंतर काही ठिकाणी शिडकावा केला. उपनगर पावसात भिजत असताना शहरात मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे दिसले.
मागील आठवड्यातील शनिवारी शहर आणि उपनगरात कोसळलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले. लोकल धिम्या होण्यासह काही काळ का होईना, मुंबईचाही वेग मंदावला. याच काळात १४ जूनपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता, परंतु हवामानात बदल झाल्यामुळे अतिवृष्टीचा इशारा मागे घेतला होता.हिंदी महासागरात पावसाच्या दृष्टीने सध्या अनुकूल वातावरण नाही़ दक्षिणेत कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्याने मान्सून कमकुवत झाला आहे़ राजस्थानातून येणाºया उष्ण वाºयांचा जोर वाढल्याने मान्सूनची प्रगती खुंटली आहे़ परिणामी उत्तर प्रदेश, दिल्लीत प्रदूषण वाढले आहे़ या आठवड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही़ २२ जूननंतरच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले. मान्सूनची वाटचाल पुढील ६ ते ७ दिवस होणार नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० जूनपर्यंत पावसाची शक्यता नाही. २२ जूनपासून दक्षिणेकडून पावसाला सुरुवात होईल.
>महाराष्ट्रात आठवडा कोरडा जाणार
वाळवंटी प्रदेशातून येणाºया शुष्क हवेच्या दाबामुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, हिंदी महासागरातही अनुकूल वातावरण नसल्याने पुढील आठवडा राज्यात कोरडा जाण्याची शक्यता आहे़ २२ जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ यामुळे खरिपाच्या पेरण्यांवरही परिणाम होणार आहे़ नैर्ऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्रातील वाटचाल ९ जूनपासून थांबली आहे़ तर राजस्थानमधील या वाºयांचा प्रभाव उत्तर भारतातही राहिल्याने १२ जूनपासून नैर्ऋत्य दिशेकडील वाटचाल थांबली आहे़ याचा परिणाम महाराष्ट्रासह देशभरात पावसाचा जोर कमी झाला आहे़