Join us  

१५ संस्थांना पालिकेची नोटीस

By admin | Published: February 24, 2016 1:56 AM

मैदान व उद्यानांसाठी पालिकेने आणलेल्या नवीन धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर आत्तापर्यंत काळजीवाहू तत्त्वावर दिलेले सर्वच भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे़

मुंबई : मैदान व उद्यानांसाठी पालिकेने आणलेल्या नवीन धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर आत्तापर्यंत काळजीवाहू तत्त्वावर दिलेले सर्वच भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे़ त्यानुसार, खेळाचे व मनोरंजन मैदानाची देखभाल करणाऱ्या ६० संस्थांना नोटीस दिल्यानंतर पालिकेने आता आणखी १५ भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़मैदाने व उद्याने काळजीवाहू तत्त्वावर देण्याचे धोरण रद्द ठरवून पालिकेने नवीन धोरण आणले़ त्यानुसार, दत्तक तत्त्वावर मैदाने खासगी संस्थांकडे देखभालीसाठी देण्यात येणार होती़ मात्र, पालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देत, २१६ भूखंड परत घेण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत़ (प्रतिनिधी)