Join us

तपासासंबंधी सर्व कागदपत्रे सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:07 AM

शिखर बँक घोटाळा; सत्र न्यायालयाचे ईओडब्लूला निर्देशतपासासंबंधी सर्व कागदपत्रे सादर कराशिखर बँक घोटाळा; सत्र न्यायालयाचे ईओडब्ल्यूला निर्देश...

शिखर बँक घोटाळा; सत्र न्यायालयाचे ईओडब्लूला निर्देश

तपासासंबंधी सर्व कागदपत्रे सादर करा

शिखर बँक घोटाळा; सत्र न्यायालयाचे ईओडब्ल्यूला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काहीच महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मात्र, या अहवालावर तक्रारदाराने आक्षेप घेतल्याने सत्र न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यापूर्वी केलेल्या तपासासंदर्भातील संपूर्ण कागदपत्रे २४ मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश ईओडब्ल्यूला दिले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आरोपी असलेल्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईओडब्ल्यूने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा नोंदविला आणि तपास केला. ५ सप्टेंबर २०२० रोजी सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

याचिकाकर्ते सुरींदर अरोरा यांनी २०१९ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या आधारावर उच्च न्यायालयाने हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ईओडब्ल्यू) कडे वर्ग केला.

अद्याप सत्र न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारलेला नाही आणि अरोरा यांनी या क्लोजर रिपोर्टच्या विरोधात न्यायालयात निषेध याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने ॲड. सतीश तळेकर यांनी ईओडब्ल्यूला तपासाची संपूर्ण कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती सत्र न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य करत ईओडब्ल्यूला तपासाची कागदपत्रे २४ मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले.

.................