ब्रह्मगिरीसह संतोषा आणि भागडी येथील उत्खनन वस्तुस्थितीदर्शक अहवाल आठ दिवसांत सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:10 AM2021-08-25T04:10:23+5:302021-08-25T04:10:23+5:30

*राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई, : गेल्या काही दिवसांपासून ब्रह्मगिरीसह संतोषा आणि भागडी डोंगररांग येथे ...

Submit factual report of excavations at Santosha and Bhagdi along with Brahmagiri within eight days | ब्रह्मगिरीसह संतोषा आणि भागडी येथील उत्खनन वस्तुस्थितीदर्शक अहवाल आठ दिवसांत सादर करा

ब्रह्मगिरीसह संतोषा आणि भागडी येथील उत्खनन वस्तुस्थितीदर्शक अहवाल आठ दिवसांत सादर करा

Next

*राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई, : गेल्या काही दिवसांपासून ब्रह्मगिरीसह संतोषा आणि भागडी डोंगररांग येथे अवैधरीत्या उत्खनन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर वन, महसूल आणि पर्यावरण यांनी एकत्ररीत्या जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करून या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करावा, असे निर्देश पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंगळवारी दिले.

सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील संतोषा, भागडी डोंगररांग बेलगाव ढसा व सारुळ गाव येथील उत्खनन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल याबबात राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

बनसोडे म्हणाले की, वन, महसूल आणि पर्यावरण यांनी एकत्ररीत्या या सर्व ठिकाणी जाऊन वस्तुनिष्ठ माहिती गोळा करावी. या ठिकाणी पाहणी करीत असताना सेव्ह ब्रह्मगिरी मोहीम राबविणारे स्वयंसेवक यांनी उपस्थित राहावे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे याबाबतचा अहवाल तातडीने तयार करून सादर करण्यात यावा. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी सुरुंग स्फोट घडवून गौण खनिजांचे उत्खनन करणे ही बाब अत्यंत गंभीर असून, या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येईल.

या पाहणीदरम्यान संबंधित समितीने ही गावे इको सेन्सिटिव्हिटी झोन (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र), बफर झोनमध्ये येत आहेत का हे सुद्धा तपासणे आवश्यक आहे. या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यात आली आहे का हे तपासून याबाबत अहवालात नमूद करण्यात यावे, अशा सूचनाही बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Submit factual report of excavations at Santosha and Bhagdi along with Brahmagiri within eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.