मासेविक्रेत्यांसाठी राज्यात शीतगृहे उभारण्याचा आराखडा सादर करा; अस्लम शेख यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 08:14 PM2021-08-10T20:14:52+5:302021-08-10T20:15:09+5:30

 मच्छिमार समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मंत्री अस्लम शेख यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठका घेतल्या.

Submit a plan to set up cold storages in the state for fishmongers; Instructions by minister Aslam Shaikh | मासेविक्रेत्यांसाठी राज्यात शीतगृहे उभारण्याचा आराखडा सादर करा; अस्लम शेख यांचे निर्देश

मासेविक्रेत्यांसाठी राज्यात शीतगृहे उभारण्याचा आराखडा सादर करा; अस्लम शेख यांचे निर्देश

Next

मुंबई : मच्छिमार सहकारी संस्थांना डिझेल परताव्याची थकित रक्कम देण्यात येत आहे. मच्छिमारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक काम करत आहे. मासे विक्री वाढविण्यासाठी राज्यात शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारण्यासंदर्भात आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी आज दिली. विविध मच्छिमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी मंत्री महोदयांनी साधला संवाद साधला.

 मच्छिमार समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मंत्री अस्लम शेख यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठका घेतल्या. यावेळी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार भाई जगताप, विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी विजय वैती, देवेंद्र तांडेल, रामदास संघे, धनाजी कोळी, संतोष कोळी, जोसेफ कोलासो, अमोल रोगे, दिलीप कोळी, लिओ कोलासो आदी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी कोवीड प्रादुर्भावामुळे व वादळांमुळे उद्भवलेल्या समस्या, तोक्ते व निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना मदत देणे, वादळग्रस्तांच्या मदतीसंदर्भातील निकषात सुधारणा करणे, कर्ज व व्याजामध्ये सवलत देणे, गोराई कोळीवाड्यातील समस्या, जमशेटजी बंदराचे बंद पडलेले काम, मासळी विक्रेत्यांना अनुदान देणे, मुंबईतील विविध मच्छिमार्केटला पर्यायी जागा देणे, ट्रॉम्बे येथील जेट्टीतील सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

मंत्री अस्लम शेख म्हणाले की, चक्रीवादळातील नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. अवैध मासेमारीविरुद्ध लवकरच कडक कायदा  येणार आहे. तसेच राज्याबाहेरील बोटींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अवैध डिझेल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Submit a plan to set up cold storages in the state for fishmongers; Instructions by minister Aslam Shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.