‘धनगर आरक्षणाचा अहवाल सादर करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:25 AM2017-12-29T05:25:22+5:302017-12-29T05:25:27+5:30
मुंबई : धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसला (टिस) अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
मुंबई : धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसला (टिस) अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत संपत असल्याने धनगर आरक्षण संघर्ष समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सदर अहवाल १७ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निवेदन टिस प्रशासनाला दिले आहे. अन्यथा १८ जानेवारीला टिसवर मूक मोर्चा काढण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
पाटील म्हणाले की, सत्तेवर येण्यासाठी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा दावा करणा-या सरकारने तीन वर्षे वेळकाढूपणा केला आहे. प्रथम उच्च न्यायालय, तर नंतर टिसच्या अहवालाचे कारण देत सरकारने आरक्षणास दिरंगाई केली आहे. मात्र यापुढे कोणतेही कारण न देता टिस प्रशासनाने तत्काळ हा अहवाल शासनास सादर करावा.