मीटर रीडिंग घेण्याची पूर्वसूचना ग्राहकांना एसएमएसद्वारे मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:44 AM2019-03-22T06:44:09+5:302019-03-22T06:44:22+5:30
ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता राहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना मिळेल.
मुंबई - ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता राहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना मिळेल. ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाइलवर एक दिवस आधीच एसएमएसद्वारे ही माहिती दिली जाणार आहे.
महावितरणने आॅगस्ट २०१६ पासून मोबाइल अॅपद्वारे मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात मोठ्या प्रमाणात अचूकता आली आहे. आता वीजमीटर रीडिंग प्रक्रियेत ग्राहकांना मीटर रीडिंग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाइलवर मीटर रीडिंगच्या पूर्वसूचनेचा एसएमएस येईल. सकाळी ८ ते १०, १० ते १२, दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ५ यादरम्यान कोणत्या वेळेत रीडिंग घेतले जाईल याची माहिती दिली जाईल. यामुळे रीडिंग घेतेवेळी ग्राहकांना उपस्थित राहून रीडिंग नीट घेतले जाते की नाही हे पाहात येईल.
महावितरणने १ मार्च २०१९ पासून राज्यातील गणेश खिंड, रास्ता पेठ, कल्याण, नागपूर शहर मंडल, वाशी व ठाणे (मुंब्राव्यतिरिक्त) अशा सहा मंडलांत ग्राहकांना मीटर रीडिंगची पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.
महावितरणकडून ग्राहकांसाठी राबविण्यात येत असलेल्या इतरही विविध उपयुक्त उपक्रमांची माहिती ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइलवर दिली जाते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या अधिकृत मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली नसेल अशा ग्राहकांनी महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे स्वत:च्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी आवश्यक आहे.
नोंदणीसाठी विविध पर्याय उपलब्ध
नोंदणी करायच्या मोबाइल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर टएफॠ (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंदणी होईल. याशिवाय कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. ग्राहक ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल अॅपद्वारेही मोबाइल क्रमांकाची नोंदणी करू शकतात.