आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी भरीव तरतूद, मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

By सीमा महांगडे | Published: February 4, 2023 11:52 AM2023-02-04T11:52:28+5:302023-02-04T11:57:24+5:30

शिक्षण विभागाचा ३ हजार ३४७.१३ कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज जाहीर

Substantial provision of education department for modern education system BMC budget 2023-24 announced | आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी भरीव तरतूद, मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी भरीव तरतूद, मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महानगरपालिकेकडून शनिवारी महानगरपालिका शिक्षण विभागाचा 3 हजार 347.13 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. मागील वर्षी 3 हजार 370.24 कोटींचा अर्थसंकल्पी अंदाज जाहीर करण्यात आला होता.

- खगोलशास्त्रीय प्रयोगशाळासाठी 60 लाखांची तरतूद तर ऑलिम्पियाड परीक्षांसाठी 38 लाखांची तरतूद
- आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी शिक्षण विभागाच्या अर्थ संकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे
- व्हरच्युल क्लासरूमसाठी 3. 20 कोटी, ई वाचनालयासाठी 10 लाख तर डिजिटल क्लासरूमसाठी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- महापालिका शाळांतील प्रशिक्षणे आणि उपक्रमांना ही महत्त्व देण्यात आले असून रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी एकूण 28 लाखांची तरतूद करण्यात आली आहे
- 2022 ते 2025 कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद
- याशिवाय पालिका शाळांमध्ये असणाऱ्या संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी एकूण 10.32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर, अधिक क्षमतेने, वेगाने वापरण्यास मिळणार आहे
- पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना व उपक्रम 2023- 24 मध्ये ही सुरू राहणार असून यामध्ये गणवेश पुरवठा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना, उपस्थिती भत्ता योजना, शालांत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य, शालेय आरोग्य कार्यक्रम, अत्याधुनिक बैठक व्यवस्था अशा उपक्रमांचा समावेश आहे
- आर्थिक वर्ष 2023 - 24 मध्ये पालिका शिक्षण विभागाकडून अनेक नवीन प्रकल्प आणि योजना ही हाती घेण्यात आल्या आहेत
- नवीन आर्थिक वर्षातील नवीन प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण असणार आहे. यासाठी 28 . 45 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. निवडक शाळांतील मुलांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे
- मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्याबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती ही विभागाकडून करण्यात येणार आहे
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार असून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पालिका शाळांतील सुरक्षा वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Substantial provision of education department for modern education system BMC budget 2023-24 announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.