उपनगराने जिगरबाज कबड्डीपटू दिले - सुनील प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:52 AM2017-12-10T06:52:14+5:302017-12-10T06:52:28+5:30

मुंबईच्या उपनगराने वैभवशाली कबड्डीची परंपरा कायम राखली आहे. शालेय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांतून उपनगरच्या अनेक कबड्डीपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

 Suburb has given Jigger Kabaddi - Sunil Prabhu | उपनगराने जिगरबाज कबड्डीपटू दिले - सुनील प्रभू

उपनगराने जिगरबाज कबड्डीपटू दिले - सुनील प्रभू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या उपनगराने वैभवशाली कबड्डीची परंपरा कायम राखली आहे. शालेय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांतून उपनगरच्या अनेक कबड्डीपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. शालेय कबड्डी स्पर्धांची व्याप्ती अधिक वाढली, तरच आपल्याला होतकरू व उदयोन्मुख कबड्डीपटू मोठ्या संख्येने मिळतील. शाळांचा क्रीडा महोत्सव म्हणजे खेळाडू निर्मितीची कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन आमदार सुनील प्रभू यांनी केले. मालाडच्या बुवा साळवी क्रीडांगणात अविनाश साळकर फाउंडेशनद्वारा
आयोजित अविनाश साळकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी सुनील प्रभू बोलत होते.
अविनाश साळकर स्मृती शालेय कबड्डी महोत्सवात उपनगरच्या २२ शालेय संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील मुलींच्या गटात मंगेश विद्यामंदिरने चंद्रभाग विद्यामंदिरचा २६-६ असा २० गुणांनी पराभव करीत विजयी सलामी दिली. माजी शाखाप्रमुख अविनाश साळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अविनाश साळकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व शिवसेना दिंडोशी विधानसभा संघटक अनघा साळकर यांनी कुरार व्हिलेजच्या कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी क्रीडांगणात या कबड्डी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
दरम्यान, या वेळी नगरसेवक आत्माराम चाचे, माजी नगरसेवक गणपत वारिसे, प्रशांत कदम, शिवसेना उपविभागप्रमुख विष्णू सावंत, शाखाप्रमुख प्रदीप निकम, राजेंद्र घाग, भारतीय विद्यार्थी सेनेचे निमंत्रक विजय गावडे, दिंडोशी विधानसभा संघटक अनघा साळकर, शिवसेना महिला उपविभाग संघटक पूजा चव्हाण आणि ज्येष्ठ शिवसैनिक गणपत साळकर हे उपस्थित होते.
या प्रसंगी महाराष्ट्र किशोरी संघात निवड झालेली उपनगरची प्रसिता पन्हाळकर, मुंबई उपनगर संघात निवड झालेला हर्ष जाधव व पायल गोळे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश
साळकर, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष मोहन परब यांनी केले.

Web Title:  Suburb has given Jigger Kabaddi - Sunil Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.