शहरांसह उपनगरात ३० दिवसांत फक्त ८७६ फेरीवाल्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 03:03 AM2017-10-15T03:03:52+5:302017-10-15T03:04:07+5:30

शहरांसह उपनगरांतील फेरीवाल्यांवर सध्या कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. हजारोंच्या संख्येने शहरात अनधिकृत फेरीवाले आहेत.

In the suburban city with only 876 hawkers in 30 days | शहरांसह उपनगरात ३० दिवसांत फक्त ८७६ फेरीवाल्यांवर कारवाई

शहरांसह उपनगरात ३० दिवसांत फक्त ८७६ फेरीवाल्यांवर कारवाई

Next

मुंबई : शहरांसह उपनगरांतील फेरीवाल्यांवर सध्या कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. हजारोंच्या संख्येने शहरात अनधिकृत फेरीवाले आहेत. सप्टेंबर महिन्यात पश्चिम रेल्वे प्रशासनाने अवघ्या ८७६ फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. यात स्थानकावरील भिका-यांचादेखील समावेश आहे. महापालिकेने सप्टेंबर महिन्यात १९ हजार फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर स्थानकांसह पादचारी पुलांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीदेखील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याबाबत रेल्वे प्रशासनाला सूचना केल्या. त्याचबरोबर, प्रत्येक स्थानकांची पाहणी करण्याचे आदेश दिले. फेरीवाल्यांवर कारवाईसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने प्रवासी रस्त्यावर उतरले. सप्टेंबर महिन्यात पश्चिम रेल्वेने फेरीवाल्यांसह भिकारी आणि विनातिकीट प्रवाशांविरुद्ध बडगा उगारला. सप्टेंबर महिन्यात
८७६ फेरीवाल्यांवर कारवाई केली. यापैकी १७५ व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांवर रेल्वे कायद्यानुसार
खटले दाखल करण्यात आले आहेत. तर १५० फेरीवाल्यांना कोठडीत पाठविण्यात आले आहे. उर्वरित फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात १२ वर्षांवरील ५५ मुले महिला डब्यात अनधिकृतपणे व्यवसाय करताना आढळली. या मुलांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.
प्रत्येक स्थानकावर शेकडोच्या संख्येने फेरीवाले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर फेरीवाल्यांची संख्या वाढत असताना, प्रशासनातर्फे होणारी कारवाई तुलनेने कमी असल्याचे समोर येत आहे. फेरीवाल्यांसह विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांविरुद्ध पश्चिम रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या प्रवाशांकडून ७ कोटी १९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: In the suburban city with only 876 hawkers in 30 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई