मुंबई : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू केले आहे. यामध्ये देशभरातील संपूर्ण रेल्वे बंद केली आहेत. मात्र १४ एप्रिलनंतर लोकल सुरु होईल, अशी चर्चा जनसामान्य सुरु आहे. मात्र १४ एप्रिलनंतरही उपनगरीय लोकल सुरु होणार नाही. लोकल संपूर्ण एप्रिल महिना बंद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च ते १४ एप्रिलला लॉकडाऊन घोषित केले. मात्र हे लॉकडाऊन एकदम उठवले जाणार नाही, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे उपनगरीय लोकल एप्रिल महिन्यात तरी सुरु करणार नसल्याचे नियोजन आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रेल्वे मंडळ आणि राज्य सरकारकडून कोरोनाग्रस्तांची संख्या, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जात नाही. तोपर्यंत रेल्वे सुरु करण्याचा निर्णय केला जाणार नाही. ओडिसा सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात राज्य सरकार आणि रेल्वे मंडळ यांच्या नियोजनातून लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईत ८५७ च्या वर कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. मुंबईच्या लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईत लॉकडाऊन पूर्णपणे संपेल, त्यानंतर आठवड्याभरात रेल्वे प्रशासन लोकल आणि रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. देशभरात पार्सल गाड्यामधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. यासह ५ हजार प्रवासी डब्यांचे रूपांतर २ हजार ५०० डब्यांचे आयसोलेशन कक्षांत केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक रेल्वे विभागाच्या बैठका आणि व्हिडीओ काँप्रेसिंग होत आहेत, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.