उपनगरीय मार्गावर जूनअखेर ४२ पादचारी पूल : रेल्वेमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:16 AM2018-02-28T04:16:36+5:302018-02-28T04:16:36+5:30

करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन-परळ येथे लष्करामार्फत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळात एकूण २० पादचारी पूल उभारण्यात आले असून, जूनअखेर आणखी २२ पादचारी पुलांचे काम पूर्ण होणार आहे.

 On the suburban route, at the end of June, 42 pedestrian bridges: Railway Minister | उपनगरीय मार्गावर जूनअखेर ४२ पादचारी पूल : रेल्वेमंत्री

उपनगरीय मार्गावर जूनअखेर ४२ पादचारी पूल : रेल्वेमंत्री

Next

मुंबई : करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन-परळ येथे लष्करामार्फत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळात एकूण २० पादचारी पूल उभारण्यात आले असून, जूनअखेर आणखी २२ पादचारी पुलांचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना जूनअखेर एकूण ४२ पादचारी पूल उपलब्ध होतील, अशी माहिती मंगळवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
लष्कराने उभारलेल्या ३ पादचारी पुलांचे लोकार्पण मंगळवारी परळ स्थानकावर करण्यात आले. या वेळी रेल्वेमंत्री बोलत होते. त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आर. एस. खुराना उपस्थित होते.
गोयल म्हणाले की, मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी अर्थसंकल्पात ४० हजार कोटींची तरतूद आहे. जून अखेर २२ पुलांचे काम पूर्ण होईल. मध्य, पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील ५६ पादचारी पुलांच्या उभारणीसाठी मंजुरी दिली आहे. या पुलांच्या निविदा प्रक्रियेपासून उभारणीपर्यंत संपूर्ण काम १२ महिन्यांत पूर्ण होईल. परिणामी, फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुंबई उपनगरीय मार्गावर एकूण ९८ पादचारी पूल मुंबईकरांसाठी खुले होतील.
एल्फिन्स्टन-परळ पुलाचे लोकार्पण फूलविक्रेता शिवराज कोंडे, करी रोड पुलाचे लोकार्पण मुंबईच्या डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून सोपान मोरे तर आंबिवली येथील पुलाचे उद्घाटन स्थानिक मत्स्यविक्रेता लता कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
‘त्या’ अधिकाºयांवर कारवाई होणार का?-
रेल्वमंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सीएसएमटी स्थानकातून ३ वाजून १६ मिनिटांनी कल्याणला जात असलेल्या लोकलच्या द्वितीय दर्जाच्या बोगीतून प्रवास सुरू केला. या वेळी सीएसएमटी ते परळ स्थानकादरम्यान रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री बसलेल्या बोगीतील दरवाजे ब्लॉक करण्यात आले होते.
बोगीत रेल्वे पोलीस, सुरक्षा रक्षक, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी-अधिकाºयांसमवेत मध्य आणि पश्चिम रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. मस्जिद स्थानकावर लोकल पोहोचताच अधिकाºयांनी लोकलचे दरवाजे अडविले. या बोगीत मुख्यमंत्री आहेत, पुढील बोगीने प्रवास करा, अशा सूचना अधिकाºयांनी स्थानकावरील प्रवाशांना दिल्या.
रेल्वे पोलीस अधिकाºयांनी सीएसएमटी स्थानकात पत्रकार, छायाचित्रकारांना धक्काबुक्की केली. याची पुनरावृत्ती परळ येथेही घडली. त्यामुळे लोकलचे दरवाजे अडवणाºया अधिकाºयांवर कारवाई होणार का, असा सवाल प्रवाशांनी केला. तर संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय भाष्य करणार नसल्याचे, अपर पोलीस महासंचालक जय जीत सिंग यांनी सांगितले.
भारतीय रेल्वे आणि लष्करी अधिकाºयांचे अभिनंदन करतो. नियोजित वेळेत लष्कराने पुलांची उभारणी केली. सामान्य मुंबईकर आणि डबेवाले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. भविष्यात मुंबईकरांना चांगल्या रेल्वे सुविधा मिळतील. एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असा विश्वास व्यक्त करतो. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
कालावधी पादचारी कोण पूर्ण करणार कामांची सद्यस्थिती
पुल
आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८, ३ लष्कर पूल प्रवाशांसाठी खुला
आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८, १७ मध्य, पश्चिम रेल्वे पूल प्रवाशांसाठी खुला
आॅक्टोबर २०१७ ते जून २०१८, २२ मध्य, पश्चिम रेल्वे पुलाचे काम सुरू
आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१९, ५६ रेल्वे प्रशासन पुलांच्या उभारणीला मंजुरी

Web Title:  On the suburban route, at the end of June, 42 pedestrian bridges: Railway Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.