मुंबई : कुर्ला येथील पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाऱ्या भुयारी पादचारी मार्गाची अवघ्या वर्षभरातच दुरवस्था झाली आहे. अस्वच्छतेबरोबरच बंद दिवे आणि पाण्याच्या गळतीमुळे मार्गावरून जाणाºया नागरिकांना मोठी कसरत करत जावे लागत आहे. गेल्या वर्षी २६ आॅक्टोबरला मोठा गाजावाजा करीत या पुलाचे उद्घाटन प्रशासनाने केले होते.कुर्ला स्थानकाच्या दोन्ही बाजूंना जोडणाºया सुमारे १२० मीटर लांब व २८ मीटर रुंद असलेल्या भुयारी मार्गाची उभारणी पालिका व रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र त्याच्या देखभालीकडे कानाडोळा करण्यात आला आहे. भुयारी मार्गावर गर्दुल्ल्यांनी कायम ठिय्या मांडलेला असतो. त्यातच सध्या पावसाचा जोर वाढल्यास मार्गात पाणी शिरते. येथील लाइटची दुरवस्था झाली असून, यामुळे भीतीच्या छायेखाली नागरिकांना येथून प्रवास करावा लागतो. त्याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे मनसेचे उपाध्यक्ष नीलाधर सकपाळ यांनी सांगितले.
कुर्ला पूर्व-पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्ग वर्षभरातच दुरवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:52 AM