Join us

विधानभवन स्थानकातून मंत्रालयापर्यंत भुयारी मार्ग; मेट्रो मार्गिकेचे २५ टक्के काम पूर्ण; सब-वे जूनपर्यंत खुला होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:50 IST

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करत आहे. या मार्गामुळे मेट्रो ३ मार्गिकेच्या विधानभवन स्थानकाची मंत्रालयाबरोबरच विधानभवनाच्या नवीन प्रशासकीय इमारतीलाही जोडणी मिळणार आहे. 

मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील विधानभवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून, ही कामे जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करत आहे. या मार्गामुळे मेट्रो ३ मार्गिकेच्या विधानभवन स्थानकाची मंत्रालयाबरोबरच विधानभवनाच्या नवीन प्रशासकीय इमारतीलाही जोडणी मिळणार आहे. 

न्यू ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीने काम मेट्रो ३ मार्गिकेचा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा जूनपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे या भुयारी मार्गेचेही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्याबरोबर सुरू करण्याचा ‘एमएमआरसी’चा प्रयत्न आहे.  दरम्यान, या सबवेचे काम डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळच्या नियोजनानुसार ते डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.  मंत्रालय आणि विधानभवन यांच्यासारख्या संवेदनशील क्षेत्राजवळ हे काम चालले असल्याने सुरक्षा परवानगीमुळे काम काहीसे संथपणे सुरू होते. आता या कामांना गती देण्यात आली आहे. न्यू ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीने सब-वेचे भुयारीकरण सुरू आहे. तसेच दुसऱ्या पाइलचे काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित काम जूनपर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.

प्रकल्प असा...रुंदी५.२ मीटर सबवेची लांबी ३०६ मीटरखर्च १०० कोटी

सब-वेचे फायदे- सरकारी कर्मचाऱ्यांना मेट्रोतून उतरून थेट मंत्रालय, नवीन प्रशासकीय भवन आणि विधानभवनात जाता येईल.- थेट कनेक्टिव्हिटीमुळे कर्मचाऱ्यांना मुख्य रस्त्यावर येण्याची गरज भासणार नाही. त्यातून रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत मिळेल.- कार्यालयात पोहोचण्यासाठी सरकारी कार्यालयांना माराव्या लागणाऱ्या फेरीपासून सुटका होईल.

टॅग्स :मुंबई