कोरोनामुक्तीनंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ने ग्रस्त महिलेचे प्राण वाचवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:05 AM2021-02-15T04:05:22+5:302021-02-15T04:05:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मिळ असा जंतुसंसर्ग झालेल्या एक महिलेचे प्राण वाचवण्यात परळ ...

Succeeding in saving the life of a woman suffering from ‘mucormicosis’ after coronation | कोरोनामुक्तीनंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ने ग्रस्त महिलेचे प्राण वाचवण्यात यश

कोरोनामुक्तीनंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ने ग्रस्त महिलेचे प्राण वाचवण्यात यश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मिळ असा जंतुसंसर्ग झालेल्या एक महिलेचे प्राण वाचवण्यात परळ येथील रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. या फंगल इन्फेक्शनमुळे हाडांची झीज आणि स्नायू कमकुवत होणे असे काही दुष्परिणाम दिसून आले आहेत. डोळ्यांवरही घातक परिमाण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन म्युकॉरर्मायकोसिस आणि विविध फंगल इन्फेक्शनवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी परळ येथील खासगी रुग्णालयात ‘म्यूकोर्मिकोसिस’ क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यात राहणाऱ्या शैला सोनार यांना कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने आणि रक्तातील साखरेच्या कमतरतेमुळे ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मिळ आजार झाला. या महिलेच्या नाकात आणि डोक्यापर्यंत हा जंतूसंसर्ग पोहोचला होता. स्थानिक रुग्णालयात या महिलेवर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्रास वाढू लागल्याने कुटुंबीयांनी तिला डिसेंबर २०२० रोजी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी महिलेवर अँटी-फंगल थेरपी सुरू करण्यात करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे संसर्ग झालेल्या डोक्यावरील टाळूचा अर्धा भाग काढून टाकण्यात आला. वेळीच उपचार झाल्याने या महिलेचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.

चौकट

म्यूकोर्मिकोसिस म्हणजे काय

याबाबत परळ येथील रुग्णालयातील कान-नाक-घसा सर्जन डॉ. मिलिंद नवलखे म्हणाले की, कोरोनातून बरे झालेले ५०हून अधिक रुग्ण मागील तीन महिन्यांत रोगप्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे बुरशीजन्य आजाराचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी आले. या आजारात रुग्णाला सर्दी होते. नाकाला सूज येऊन वेदना जाणवू लागतात. वेळीच उपचार न झाल्यास डोळ्यावर परिणाम होऊन दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. परंतु, अनेकांना या आजाराबद्दल माहिती नसल्याने रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे जातात. या आजाराला नाकाची पोकळी आणि नाकासंबंधी सायनसपासून सुरुवात होते. त्यानंतर डोळ्यांवर आणि मेंदूवर याचा परिणाम होतो. अशा स्थितीत संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी शरीरातील ज्या भागात संसर्ग झाला आहे तो भाग काढून टाकावा लागतो.

रुग्णांची संख्या वाढतेय

म्यूकोर्मिकोसिसचा संसर्ग हा अतिशय गंभीर आहे. एकप्रकारे फंगल इन्फेक्शन असून, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहे. सध्या या रुग्णांची संख्या सध्या वाढताना दिसून येत आहे. मधुमेह असलेले आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना याचा धोका अधिक असतो. या बुरशीजन्य संसर्गाने हाडांची झीज होणे, स्नायू कमकुवत होणे, डोळ्यांवर दुष्परिणाम होणे अशा तक्रारी समोर येत आहेत.

...............................

Web Title: Succeeding in saving the life of a woman suffering from ‘mucormicosis’ after coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.