ताडीमध्ये भेसळ करणारे रॅकेट गजाआड, उत्पादन शुल्क विभागाचं यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:34 AM2017-11-16T02:34:28+5:302017-11-16T02:34:45+5:30

ताडीमध्ये नशा आणण्यासाठी केमिकलचा वापर करणारे एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले.

 The success of the Duties of the Excise Duty Department | ताडीमध्ये भेसळ करणारे रॅकेट गजाआड, उत्पादन शुल्क विभागाचं यश

ताडीमध्ये भेसळ करणारे रॅकेट गजाआड, उत्पादन शुल्क विभागाचं यश

Next

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : ताडीमध्ये नशा आणण्यासाठी केमिकलचा वापर करणारे एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले.
क्लोरल हायड्रेट सदृष्य अत्यंत घातक पावडरचा साठा पुणे, सातारा, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, कांदिवली, मीरा भाईंदर येथे छापे टाकून जप्त करण्यात आला. ही पावडर अत्यंत घातक असून तिचा वापर ताडीमध्ये नशा वाढवून गुंगी आणण्यासाठी केला जातो.
आरोपीनी दिलेल्या माहितीच्या आधारावर डोंबिवली आणि भिवंडी इथे छापा टाकून अश्याच प्रकारची घातक रसायने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी एकूण ९ जणांना अटक केली असून अजुन २ आरोपी फरार आहेत.
संतोष मोगलय्या गुत्तेदार, सातारा जिल्ह्यातील अस्मिता केमिकल्सचा मालक मिलिंद तुकाराम घाडगे व कामगार दिनकर नलावडे यांना अटक करण्यात आली. मिलिंद घाडगे याला क्लोरल हायड्रेट तयार करण्यासाठी लागणारी कच्ची रसायने व पदार्थ मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणारा प्रकाश जेठाभाई गोपवाणी हा देत असल्याचे व तयार झालेल्या मालापैकी काही माल घेत असल्याचे तपासात उघड झाले. श्रीनिवास उर्फ नरेंद्र व्यंकट नरसय्या भीमानाथीनी हा आरोपी फरार आहे. विनोद लक्ष्मण बैर (मीरा-भार्इंदर, अमरागिनी विजया भास्कर (भाईंदर) लक्ष्मण गुरुमूर्ती तेड्डू (डोंबिवली) चंद्रय्या रामलु पोनम, (कल्याण) जयराजु पदय्या मगडी यांना अटक करण्यात आली.

Web Title:  The success of the Duties of the Excise Duty Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.