मुंबई : बेस्टच्या विद्युत विभागात कार्यरत असलेल्या ७२६ कामगारांचा सेवेत कायम सामावून घेण्याबाबत . आमदार प्रसाद लाड अध्यक्ष असलेल्या आणि श्रमिक उत्कर्ष सभेशी संलग्न असलेल्या द इलेक्ट्रिक युनियनच्या माध्यमातून बेस्टच्या विद्युत विभागातील या कामगारांचा प्रश्न सुटला आहे. १२३ कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबतचे नियुक्ती पत्र, सह्याद्री शासकीय अतिथी गृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून, त्यांची कामं करून, त्यांची मने जिंकण्याची कामे करण्याचे कार्य आमदार प्रसाद लाड यांनी केले असल्याची भावना यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यांची साथ मिळाली आणि कामाला गती मिळाली असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रश्न ६०३ चा :
बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील उर्वरित ६०३ कामगारांना देखील न्याय देण्यासाठी मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. १६ वर्षांच्या संघर्षानंतर या नैमित्तिक कामगार बांधवांचा विजय झाला असून, याकरिता राज्य सरकार, बेस्ट प्रशासन आणि मुंबई महापालिकेचे आभार व्यक्त करतो, अशी भावना आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केली. उर्वरित ६०३ कामगार बांधवांना देखील तत्काळ टेम्पररी करावे आणि पुढे जावून सेवेत कायम करावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, मुख्य महाव्यवस्थापक आर. डी. पाटसुटे, कर्मचारी व्यवस्थापक के. एम.परमाशे, आमदार गोपीचंद पडळकर, द इलेक्ट्रिक युनियनचे संजय घाडीगावकर, श्रमिक उत्कर्ष सभेचे भालचंद्र साळवी आणि बेस्टचे कामगार व कर्मचारी उपस्थित होते.