भांडुप दुर्घटनेत घारीला वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:16+5:302021-07-20T04:06:16+5:30
मुंबई : रविवारी भांडुप येथे झालेल्या दुर्घटनेत एक घार जखमी झाली होती. या घारीला प्राणी मित्रांच्या साह्याने वाचविण्यात यश ...
मुंबई : रविवारी भांडुप येथे झालेल्या दुर्घटनेत एक घार जखमी झाली होती. या घारीला प्राणी मित्रांच्या साह्याने वाचविण्यात यश आले आहे. मुसळधार पावसामुळे भांडुप पश्चिमेला अमर कोर विद्यालयाजवळ रविवारी भिंत कोसळली होती. या घटनेत सोहम थोरात या १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी भेट दिली असता त्यांना या ठिकाणी घार हा पक्षी जखमी अवस्थेत आढळला.
यावेळी स्थानिक नगरसेविका जागृती पाटील यांनी या घारीची सुखरूपपणे सुटका केली. यानंतर त्यांनी अम्मा केअर फाऊंडेशन आणि पीएडब्ल्यूएस-मुंबईच्या टीमशी संपर्क साधला. यावेळी स्वयंसेवक प्रथमेश उघाडे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घरीला ताब्यात घेतले. यानंतर घारीला उपचारांकरिता पशुवैद्य डॉ. राहुल मेश्राम यांच्याकडे नेण्यात आले. प्रथमोपचार केल्यानंतर पक्षी उडण्यास योग्य होईपर्यंत त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, असे मेश्राम यांनी सांगितले.